आदिवासी बांधवांना विद्यार्थ्यांनी वाटप केले दहा क्विंटल धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 09:46 PM2019-11-25T21:46:45+5:302019-11-25T21:47:06+5:30

जळगाव - ओरियन सीबीएससी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘फूड बँक’ या कल्पनेतून तब्बल दहा क्विंटल धान्य गोळा करून चोपडा तालुक्यामधील उनपदेवजवळील ...

 Students distribute ten quintals of grain to tribal brothers | आदिवासी बांधवांना विद्यार्थ्यांनी वाटप केले दहा क्विंटल धान्य

आदिवासी बांधवांना विद्यार्थ्यांनी वाटप केले दहा क्विंटल धान्य

Next

जळगाव- ओरियन सीबीएससी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘फूड बँक’ या कल्पनेतून तब्बल दहा क्विंटल धान्य गोळा करून चोपडा तालुक्यामधील उनपदेवजवळील पाड्यांवरील आदिवासी बांधवांना वाटप केले.

ओरियन सीबीएससी स्कूलच्या माध्यमातून ‘देण्यातून आनंद’ हा उपक्रम राबविण्यात आला़ त्यातंर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळून दहा क्विंटल धान्य व बेसन पीठ गोळा केले़ त्यानंतर चोपडा तालुक्यातील उनपदेव जवळील पाड्यांवर आदिवासी बांधवांना ते वाटप करण्यात आले. सोबतच आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन्सिल, बिस्किटही देण्यात आले़ या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची, शाळा समन्वयक के.जी.फेगडे, उपप्राचार्य माधवी सिट्रा, डॉ.शमा फेगडे व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती़

Web Title:  Students distribute ten quintals of grain to tribal brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.