विद्यार्थ्यांनी दिवाळीत कपडे, फटाके न घेता रूग्णांना केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 07:01 PM2017-10-20T19:01:36+5:302017-10-20T19:14:48+5:30
चाळीसगाव येथील सेंट जोसेफ स्कूलचा उपक्रम
Next
ठळक मुद्देचाळीसगाव येथील सेंट जोसेफ स्कूलचा उपक्रम रुग्णालयास भेट देत रूग्णांसोबत साधला संवादफटाके, कपडे न घेता पैसे दिले रुग्णांना
ल कमत अॉनलाईन चाळीसगावः दि. २० : एरवी दिवाळी म्हटली की, शालेय विद्यार्थ्यांना फटाके, कपड्यांचे मोठे अप्रुप असते. चाळीसगावच्या सेंट जोसेफ काॕन्व्हेंट स्कुलचे विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. त्यांनी दिवाळीत नविन कपडे न घेता आणि प्रदूषणमुक्त दिवाळीही फटाके न फोडता चक्क रुग्णांसोबत साजरी केली. साईकृष्णा व कृष्णा क्रिटीकल केअर हाॕस्पीटल मध्ये जाऊन शुक्रवारी विद्यार्थ्यांनी दहा हजाराची मदत केली. मुख्याध्यापिका सिस्टर लिजी, उपमुख्याध्यापिका सिस्टर दिव्या यांनी विद्यार्थ्यांना डोळस अनुभव यावा म्हणुन या उपक्रमाचे आयोजन केले. याला शाळेतील काही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. डॉ. सुनिल राजपूत, डॉ. पल्लवी वाडेकर, डॉ. चंदा राजपूत यांच्या मदतीने पाय फॕक्चर असलेल्या १७ वर्षीय शशिकांत विजय चौधरी, साथीच्या आजाराने त्रस्त मायाबाई वाघ व तिचे अकरा महिन्याचे बाळ यांना प्रत्येकी पाच हजाराची मदत केली. रुग्णांशी विद्यार्थ्यांनी छान गप्पाही मारल्या. या दोन्ही रुग्णांची आर्थिक स्थिती बेताची आहे. विद्यार्थ्यांनी केलेली मदत पाहुन रुग्णांना गहिवरुन आले. यावेळी रश्मी पाटील, पुनम वाघमारे, नंदकिशोर महाजन, विजय चौधरी आदी उपस्थित होते.