जळगावातील विद्यार्थ्यांनी केले पेरणी दरम्यान बियाणे बचतीचे यंत्र विकसीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 09:59 PM2018-06-01T21:59:25+5:302018-06-01T21:59:25+5:30
बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी विभागातील मुलांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे पेरणीचे काम सुलभ, सोपे आणि जलद गतीने होणार.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१ : बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी विभागातील मुलांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे पेरणीचे काम सुलभ, सोपे आणि जलद गतीने होणार.
शेतकºयांना पेरणी साठी फारच महागडे बियाणे खरेदी करावे लागते. त्यातच व्यवस्थित पेरणी न झाल्यास पीकही कमी येते. पेरणी दरम्यान साधारणपणे १० ते २० टक्के बीज वाया जाते. ही बाब लक्षात घेत आय.टी.विभागाच्या साफिया पटेल, पलक सोनवणे, प्रतीक्षा पाटील, रक्षदा सरादे व तृप्ती सोनवणे या विद्यार्थांनी पेरणीचे यंत्र इंटरनेट आॅफ थिंग्स च्या मदतीने विकसित केले आहे. या यंत्राद्वारे शेतकरी बांधव दोन रोपांमधील अंतर, बीज किती खोलवर गेले पाहिजे हे ठरवू शकतात. यंत्राला आॅटो मोड मध्ये ठेवून हेच काम यंत्र स्वत: करेल. या यंत्राद्वारे पेरणी केल्यास १००% हमखास पीक उतरेल व बियाण्याचे नुकसान होणार नाही. या उपकरणात 'सेन्सर' चा प्रामुख्याने वापर करण्यात आले आहे. हे सेन्सर जमिनीतला ओलावा शोधून किती खोलवर बीज पेरायचा आहे ते ठरवते. हे उपकरण बॅटरी वर चालणार असून बैल जोडीची आवश्यकता राहणार नाही. यासाठी विभाग प्रमुख डॉ उमेश भदादे, प्रोजेक्ट इंचार्ज प्रा. एस. जे. पाटील आणि प्रोजेक्ट गाइड प्रा.एन.पी.जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.