विद्यार्थ्यांनी जाणून घेतली निरिक्षण गृहाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 07:09 PM2019-09-23T19:09:34+5:302019-09-23T19:10:20+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणाशास्त्र विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्ष एम.एड. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यासाठी जळगाव ...

 Students learned about the observation house | विद्यार्थ्यांनी जाणून घेतली निरिक्षण गृहाची माहिती

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली निरिक्षण गृहाची माहिती

Next

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणाशास्त्र विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्ष एम.एड. विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यासाठी जळगाव येथील मुलांचे व मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहास भेट दिली.

यावेळी निरीक्षण गृह व बालगृहाच्या अधिक्षक जयश्री पाटील यांनी निरीक्षण गृह व बालगृहातील सोयी-सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रशासन व व्यवस्थापन, अध्ययन-अध्यापन, समुदेशन याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तेथील मुलां व मुलांशी संवाद साधून माहिती घेतली. निरीक्षण गृह व बालगृहातील मुलां व मुलींसाठी वह्या व पेन भेट म्हणून दिल्या. विद्यार्थ्यांसोबत प्रा.धमेंद्र जाधव व प्रा.जयश्री शिंगाडे उपस्थित होते. प्रात्यक्षिक भेट यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. मनिषा इंदणी व डॉ.संतोष खिराडे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title:  Students learned about the observation house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.