धरणगाव येथे विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 03:14 PM2019-02-12T15:14:57+5:302019-02-12T15:16:00+5:30

धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक यांनी सूर्यनमस्कार घातले.

Students organized at Dharangaon, | धरणगाव येथे विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

धरणगाव येथे विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देठोंबरे-कुडे विद्यालयात रथसप्तमीनिमित्त कार्यक्रमशिक्षकांनी सांगितले सूर्यनमस्काराचे महत्त्व

धरणगाव, जि.जळगाव : येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात रथसप्तमी अर्थात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षक यांनी सूर्यनमस्कार घातले.
प्रारंभे क्रीडाशिक्षक कैलास माळी यांनी रथसप्तमी व सूर्यनमस्काराचे माणसाच्या जीवनात किती महत्त्व आहे, नियमित व्यायाम असला तर शरीर तंदुरुस्त राहते अशी बहुमोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.
क्रीडाशिक्षक एस.एल.सूर्यवंशी यांनी सूर्यनमस्कार मंत्र पठण व विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. आर.डी.महाजन यांनी गाईड म्हणून शास्त्रीय पध्दतीने विद्यार्थ्यांसोबत सूर्यनमस्कार घातले.
याप्रसंगी प्राथमिक मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक एस.एस.पाटील, डी. एन.चौधरी, सुदाम चौधरी आदी शिक्षकांनीही सूर्यनमस्कार घालून रथसप्तमी दिवस साजरा केला.

Web Title: Students organized at Dharangaon,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.