जळगावात जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्याथ्र्याच्या रांगा
By admin | Published: June 13, 2017 11:04 AM2017-06-13T11:04:41+5:302017-06-13T11:04:41+5:30
ऐन प्रवेशावेळी त्रुटी दुरुस्तीने संताप : महाविद्यालयाकडूनही दुर्लक्ष; अभियांत्रिकी प्रवेशासाठी अडचण
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.13- बारावीचा निकाल लागल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ऐन परीक्षेचा काळात विद्याथ्र्याना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. वर्षभरापूर्वी अर्ज भरल्यानंतर कार्यालयाकडून ऐन प्रवेशाच्या काळातच त्रुटी दुरुस्तीसाठी जात वैधता प्रमाणपत्र विद्याथ्र्याकडे पोहचविली आहेत. यामुळे सोमवारी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात विद्याथ्र्याचा रांगा लागल्या होत्या.
अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्याथ्र्याना जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी महाविद्यालयात अर्ज भरावा लागत असतो. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातच आटोपते. त्यानंतर विद्याथ्र्याना जात वैधता प्रमाणपत्र महाविद्यालय किंवा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात मिळत असतात. प्रमाणपत्रात काही त्रुटी राहिल्यास त्या त्रुटी दुरुस्तीसाठी प्रमाणपत्र विद्याथ्र्याच्या घरी पोस्टाव्दारे पाठविले जातात. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी तपासणी कार्यालय जानेवारी महिन्यात जळगावात सुरु झाल्यानंतर 7 हजार 770 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 5 हजार 550 प्रमाणपत्र वाटप करण्यात आली आहेत. तर 2 हजार 220 प्रकरणांमध्ये त्रुटी निघाल्यामुळे त्रुटीच्या दुरुस्तीसाठी ही प्रमाणपत्रे संबधित विद्याथ्र्याकडे पोस्टाव्दारे पाठविण्यात आली आहेत. मात्र अनेक विद्याथ्र्याना ही प्रमाणपत्रे अद्याप मिळालेली नसल्याची माहिती विद्याथ्र्यांनी दिली.