ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 04:13 PM2018-09-01T16:13:33+5:302018-09-01T16:14:10+5:30
मुक्ताईनगर येथे सामान्यज्ञान परीक्षा
मुक्ताईनगर, जि.जळगाव : ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता खूप आहे. मात्र कस्तुरी मृगाप्रमाणे आपल्यालाच आपल्याजवळ असलेल्या गुणवत्तारुपी कस्तुरीचा पत्ता लागत नाही. त्यामुळे आपण त्या भागाला पैलू पाडून आपली गुणवत्ता सुधारावयास हवी, असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले.
येथील जी. जी. खडसे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सामान्यज्ञान परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर परीक्षेस महाविद्यालयीन स्तरावरील ४५० विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे विभागून जागृती संजय कुरकुरे व वैभव राजेंद्र टोकरे यांनी मिळवले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून अभिषेक रावसाहेब पठारे व अक्षय कैलास पाटील, श्वेता लीलाधर शेंदुरकर व सागर गजानन जावरे यांनी मिळवले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून शीतल निवृत्ती लोखंडे, अर्जुन विपुल खिरोळकर व मेघा श्रीकृष्ण आवारकर यांनी मिळविले.
याप्रसंगी व्यासपीठावर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सी.एस.चौधरी, मुक्ताईनगरचे प्रतिष्ठित नागरिक नितीन जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर.पाटील,उपप्राचार्या एन.ए. पाटील, उपप्राचार्य एस. एम. पाटील तसेच इतर प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.डॉ.सी.जे. पाटील, प्रा.डी.आर. कोळी, प्रा.वंदना चौधरी, प्रा.सी.ए.नेहेते, प्रा.डॉ.पी.एस.प्रेमसागर व प्रा.डॉ. गायकवाड यांनी प्रयत्न केले तर प्रा.व्ही.बी. डांगे यांनी सूत्रसंचालन केले.