नवीन संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:08 PM2017-12-04T17:08:33+5:302017-12-04T17:12:40+5:30

जामनेर येथे तालुका विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ

Students should study for new research: Girish Mahajan | नवीन संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : गिरीश महाजन

नवीन संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : गिरीश महाजन

Next
ठळक मुद्देजामनेर येथे तालुका विज्ञान प्रदर्शनास प्रारंभतालुक्यातील विद्यार्थ्यांनी मांडले प्रदर्शनात यंत्रजिद्द कायम ठेवल्याने झालो मंत्री : गिरीश महाजन

आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि.४ : आजच्या युगात शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त नवीन संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून जामनेरचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आबाजी नाना पाटील होते. यावेळी मंचावर सभापती संगीता पिठोडे, जि.प.सदस्या सुनीता पाटील, प्रमिला पाटील, विद्या खोडपे, पं.स.सदस्या सुनंदा पाटील, नीता पाटील, अमर पाटील, गोपाल नाईक, शिक्षण अधिकारी आर.पी.दुसाने, दीपक पाटील, दिलीप महाजन, राजाराम शर्मा, प्रा.शरद पाटील, जितू पाटील, नवल राजपूत, राजू कवाडिया, मुख्याध्यापक डी.एस.पाटील, रमन चौधरी उपस्थित होते.
गिरीश महाजन म्हणाले की, शालेय अभ्यासक्रमाशिवाय इतर विषयावर चिकित्सक अभ्यास करावा. त्याला विज्ञानाची जोड लावून नवनवीन संशोधन करावे. मी शालेय जीवनात राजकारणाशी जोडलो गेलो. राजकारणातील छोट्या पदापासून मंत्रीपदापर्यंत पोहोचलो. मनात जिद्द होती म्हणून मी मिळविले. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाशिवाय इतर काही संशोधन करण्यासाठी अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक शिक्षण अधिकारी आर.पी.दुसाने यांनी केले. सूत्रसंचलन सुधीर साठे यांनी तर आभार बी.आर.चौधरी यांनी मानले.

Web Title: Students should study for new research: Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.