विद्यार्थ्यांनी केला आदिवासी संस्कृतीचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:48 PM2019-10-14T21:48:49+5:302019-10-14T21:55:46+5:30
जळगाव - मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या प्रथम वर्षातील २३ विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी शनिवारी सकाळी चोपडा तालुक्यातील गौºयापाडा या ...
जळगाव- मू.जे. महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाच्या प्रथम वर्षातील २३ विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी शनिवारी सकाळी चोपडा तालुक्यातील गौºयापाडा या आदिवासी वस्तीला भेट देवून तेथील आदिवासी संस्कृतींसह परंपरांचा व त्यांना भेडसावणा-या दैनंदिन समस्यांचा अभ्यास केला. निमित्त होते अभ्यासक्रमातंर्गत अभ्यासदौ-याचे.
आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने मू.जे.च्या पत्रकारिता विभागातर्फे अभ्यास दौ-याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते़ अभ्यासदौरानिमित्त चोपडा तालुक्यातील गौºयापाडा या वस्तीला विद्यार्थ्यांनी भेट दिली़ त्यानंतर त्यांच्या संस्कृती, परंपरा व त्यांच्या दैनदिन आयुष्याला जवळून जाणून घेऊन त्याच्या जीवनमानात बदलत्या काळानुसार कोणते बदल होत आहेत तसेच त्यांच्या पुढील समस्या व त्या सोडवण्यासाठी कुठले उपाय योजता करता येतील यासारख्या विविध बाबींचा मागोवा या अभ्यासदौºयात घेतला गेला.
वाद्यवृंदावर धरला ठेका
विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांकडून प्रश्नोत्तरच्या माध्यमातून चर्चा करून आवश्यक ती माहिती जाणून घेतली़ सोबतच त्यांच्या सांस्कृतिक वाद्यवृंदाच्या ठेक्यावर नृत्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच आदिवासी बांधवाशी संवाद साधून त्यांच्या अडअडचणी विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या़ तसेच संपुर्ण भेटीचा अहवाल विद्यार्थ्यांना तो विभागाला सादर करायचा आहे. या दौºयात जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार, केतकी सोनार, प्रशांत सोनवणे, अभय सोनवणे व संजय जुमनाके यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.