पालक रागवण्याच्या भीतीने विद्याथ्र्याची आत्महत्या
By admin | Published: February 15, 2017 12:18 AM2017-02-15T00:18:01+5:302017-02-15T00:18:01+5:30
लहान मुलाला दुचाकीचा कट लागल्याचे निमित्त : नववीत शिकणा:या चेतनचा आयुष्याला पूर्णविराम
किनगाव, ता.यावल : दुचाकी चालविताना झालेल्या अपघातामुळे एका लहान मुलाला इजा झाली, यामुळे वडील आणि आजोबा मारतील या भीतीपोटी नववीतील विद्याथ्र्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना किनगाव खुर्द येथे मंगळवारी सकाळी घडली.
संजय पंडित पाटील यांचा मुलगा चेतन (वय 15) हा मंगळवारी सकाळी दुचाकीने गावात गेला होता. डॉ.आंबेडकर पुतळय़ाजवळ लहान मुलाला दुचाकीचा धक्का लागला आणि त्यात चिमुरडय़ाच्या डोळय़ाला इजा झाली. ही घटना घरी समजली तर वडील व आजोबा रागवतील तसेच मारही खावा लागेल या भीतीपोटी चेतनने घर गाठले आणि पिकांवर फवारणी करण्याचे औषध सेवन केले.
आई-वडिलांचा आक्रोश
चेतन मृत झाल्याचे समजताच त्याच्या आई-वडिलांनी आक्रोश केला. यावेळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी 1 वाजेच्या सुमारास चेतन याचा मृतदेह किनगाव येथे नेण्यात आला. या घटनेमुळे किनगाव येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
चेतन हा किनगाव येथे आई-वडील, आजोबा तसेच मोठा भाऊ यांच्यासोबत राहत होता. तर त्याचे आई-वडील हे शेती काम करतात. मोठा भाऊ गौरव दहावीला शिक्षण घेत आहे. तर चेतन हा नववीत होता.
घरात एकटाच असताना घेतले कीटकनाशक
कीटकनाशक प्राशन केल्यावर चेतन अत्यवस्थ झाला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्याने त्याला तत्काळ येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले .
वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पाटील यांनी प्राथमिक उपचार करून लागलीच त्यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र त्या ठिकाणी त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
चेतनच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजोबा असा परिवार आहे. यावल पोलिसांनी यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.