चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची दमछाक

By admin | Published: February 27, 2017 01:08 AM2017-02-27T01:08:21+5:302017-02-27T01:08:21+5:30

राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.

Students' tension due to wrong questions | चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची दमछाक

चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची दमछाक

Next

जळगाव : महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवीच्या ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाच्या प्रश्न पत्रिका संच ‘डी’मध्ये प्रश्न क्रमांक ९ ते ११ हे  चुकीचे असल्याचे  समोर आले आहेत. हे तिन्ही प्रश्न परिच्छेद वाचून सोडविण्याचा सूचना प्रश्नपत्रिकेत देण्यात आल्या. मात्र प्रश्नपत्रिकेत संबधित प्रश्नांचा एक ही परिच्छेद नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या.
विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला
राज्य परीक्षा परिषदेतर्फे या वर्षांपासून  इयत्ता ४ थी व ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील २१३ परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडली. मात्र इयत्ता पाचवीच्या ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाच्या ‘डी’ प्रश्नपत्रिका संचातील तीन प्रश्नांच्या घोळ मुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला. याबाबत मनसेचे माजी महानगरप्रमुख विरेश पाटील व सचिव अविनाश पाटील या जागृत पालकांनी नाराजी व्यक्त केली.
काय आहे प्रकार
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  इयत्ता पाचवीचे दोन पेपर घेण्यात आले. दुपारी १.३० ते ३ वाजेदरम्यान ‘भाषा व बुध्दीमत्ता चाचणी’ या विषयाचा  पेपर घेण्यात आला. यामध्ये डी संचात प्रश्न क्रमांक ९ ते ११ या तीन प्रश्नासाठी परिच्छेद वाचून त्यावर आधारीत  विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र विचारलेल्या प्रश्नांसंबधीचा परिच्छेद प्रश्न पत्रिकेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविताना अडचणी आल्या. याबाबत विद्यार्थ्यांकडून शिक्षकांकडे तक्रारी करण्यात आल्या.
चुकांबद्दल कोणतीही तक्रार पालक वर्गाकडून आली नाही.  तक्रार आल्यास संबधित प्रश्नांबाबत महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेला तो अहवाल पाठविला जाईल.  विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल.
-बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक विभाग
३२ हजार १६५ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३३ हजार  ८६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३२ हजार १६५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. १ हजार ७०३ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर राहिले. इयत्ता पाचवी चे १२४६ तर आठवीचे ४५७ विद्यार्थी गैरहजर राहिले. यंदापासून शिष्यवृती परीक्षेसाठी बहुसंच प्रश्न पत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे देखील विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Students' tension due to wrong questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.