बस न आल्याने विद्याथ्र्याचा ट्रॅक्टरने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:39 PM2017-10-06T12:39:08+5:302017-10-06T12:39:54+5:30

परीक्षा संपल्यानर केला रस्ता रोको

The student's tractor travels due to the failure of the bus | बस न आल्याने विद्याथ्र्याचा ट्रॅक्टरने प्रवास

बस न आल्याने विद्याथ्र्याचा ट्रॅक्टरने प्रवास

Next
ठळक मुद्देअडावद बसस्थानक परिसरात विद्याथ्र्यांचे रास्तारोका आंदोलन70 ते 80 विद्यार्थी पोलीस ठाण्यात पोहचले

ऑनलाईन लोकमत

अडावद, जि. जळगाव, दि. 6 - मुक्कामी बस न आल्याने चोपडा तालुक्यातील अडावद येथे शाळेत परीक्षेसाठी येणा:या पिंप्री , कमळगाव, चांदसणी व रुखणखेडा येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना पायपीट  करीत करावी लागली. परीक्षा असल्याने पिंप्री येथील सरपंच संजय इंगळे यांनी मुलींना पोहचविण्यासाठी ट्रॅक्टर पाठविले  व त्याद्वारे मुलींना शाळेत सोडले. अनेक विद्याथ्र्याना  पायपीट करीतच शाळा गाठावी लागली. राज्य परिवहन महामंडळाच्या  ढिसाळ नियोजनामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. 
अडावद बसस्थानक परिसरात विद्याथ्र्यांचे रास्तारोका आंदोलन
परीक्षा संपल्यानंतर विद्याथ्र्यानी अडावद बसस्थानकामध्ये रस्ता रोको आंदोलन केले. तेथे त्यांनी कायमस्वरुपी बस मिळण्याती मागणी केली. त्यानंतर 70 ते 80 विद्यार्थी पोलीस ठाण्यात पोहचले. 

Web Title: The student's tractor travels due to the failure of the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.