उपोषणार्थी विद्यार्थी नाशिकला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 10:23 PM2017-10-13T22:23:28+5:302017-10-13T22:27:46+5:30

आदिवासी विद्याथ्र्याचे चोपडा येथे सुरू असलेले उपोषण दुस:या दिवशीही सुरूच असून हे विद्यार्थी आता नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयावर उपोषण करण्यासाठी शुक्रवारी रात्रीच रवाना झाले आहेत.

Students of Upoorshi students leave for Nashik | उपोषणार्थी विद्यार्थी नाशिकला रवाना

उपोषणार्थी विद्यार्थी नाशिकला रवाना

Next
ठळक मुद्देआमदार, अधिका:यांशी चर्चा देखल निष्फळविद्यार्थी मागण्यांसाठी उपोषणावर ठाम

लोकमत ऑनलाईन चोपडा, दि.13 : येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्याथ्र्यांनी विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या दुस:या दिवशी दिवसभरात अनेकांशी चर्चा झाल्यानंतरही सर्वमान्य तोडगा न निघाल्याने हे विद्यार्थी उपोषणावर ठाम आहेत. केवळ आश्वासनेच मिळत असून ठोस कार्यवाही होत नसल्याने उपोषणाचा पुढचा टप्पा म्हणून हे विद्यार्थी नाशिक येथे आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे शुक्रवारी रात्रीच रवाना झाले. दरम्यान, दिवसभरात तालुक्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह तहसिलदार दीपक गिरासे, यावल प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, पो. नि. किसनराव नजनपाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी सुनील चौधरी, आदिवासी कार्यकर्ते ताराचंद पावरा यांनी उपोषणकत्र्यांशी चर्चा केली. परंतु प्रकल्पस्तरावर त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासारख्या नसल्याने विद्याथ्र्यांनी नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयावर उपोषण करण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा 54 मुले व 37 मुली नाशिक येथे रवाना झाले. दारासिंग पावरा, सागर पावरा, हुमा पावरा, मिथुन बारेला, मुन्ना बारेला, आशा बारेला, रिबिका गावित, सपना किराडी, मीना भिलाला हे उपोषणकत्र्याचे नेतृत्व करत आहेत. दरम्यान, डॉ. मनोज पाटील, डॉ. पाथरवट यांनी उपोषणकत्र्या विद्याथ्र्यांची वैद्यकीय तपासणी केली. दिवसभराच्या चर्चेतूनही मार्ग निघत नसल्याचे जाणवल्याने तहसील, पोलीस व आदिवासी कार्यालय अधिका:यांच्या चेह:यावर चिंता दिसून येत होती. मात्र रात्री विद्याथ्र्यांनी नाशिककडे कुच करताच प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: Students of Upoorshi students leave for Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.