सकारात्मक विचार ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:50+5:302021-09-02T04:34:50+5:30
विसावे हे भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुक्याच्यावतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित गुणवंत पाल्य व कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रमप्रसंगी ...
विसावे हे भडगाव येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव तालुक्याच्यावतीने पंचायत समिती सभागृहात आयोजित गुणवंत पाल्य व कोरोनायोद्धा सन्मान कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे, नायब तहसीलदार महेंद्र मोतीराय, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, महिला दक्षता समिती अध्यक्ष योजना पाटील, तालुकाध्यक्ष रवी अहिरे, तालुका उपाध्यक्ष मधुकर वाघ, सचिव आबा बाविस्कर, युवा अध्यक्ष सुधीर अहिरे, महिला तालुकाध्यक्ष लता अहिरे, महिला उपाध्यक्ष सुरेखा वाघ, प्रा. दिनेश तांदळे, पत्रकार अशोक परदेशी, संजय पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शाखेच्यावतीने शहरातील दहावी, बारावी, पदवी, पदविका उत्तीर्ण विद्यार्थी व कोरोनाकाळात मदत करणारे शासकीय कर्मचारी व पत्रकार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, पो. कॉ. ईश्वर पाटील, पो. कॉ. प्रल्हाद शिंदे, किरण ब्राह्मणे यांसह इतर विभागातील कर्मचारी यांचा सहभाग आहे.
यावेळी भडगाव महाविद्यालयातील क्रीडाशिक्षक प्रा. दिनेश तांदळे यांनी शारीरिक शिक्षण विषयात पीएच.डी. मिळविली याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवी अहिरे यांनी केले तर सूत्रसंचलन बाळकृष्ण जडे यांनी केले.
010921\01jal_1_01092021_12.jpg
सकारात्मक विचार ठेवल्यास विद्यार्थ्यांना यश मिळेल