विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली जि.प.शाळेची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:02 PM2020-08-06T15:02:25+5:302020-08-06T15:03:40+5:30

'माझी शाळा' या संकल्पाने प्रेरीत होत तालुक्यातील निमखेडी बुद्रूक येथील जय म्हासोबा बहुउद्देशीय संस्था तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने युवकांनी पुढाकार घेत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्यव जिल्हा परिषद शाळेबी साफसफाई करून एक आदर्श निर्माण केला आहे.

Students worked hard to clean the ZP school | विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली जि.प.शाळेची सफाई

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली जि.प.शाळेची सफाई

googlenewsNext
ठळक मुद्देनिमखेडी बुद्रूक येथे उपक्रम माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग

विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : 'माझी शाळा' या संकल्पाने प्रेरीत होत तालुक्यातील निमखेडी बुद्रूक येथील जय म्हासोबा बहुउद्देशीय संस्था तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने युवकांनी पुढाकार घेत शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्यव जिल्हा परिषद शाळेबी साफसफाई करून एक आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळा निमखेडी बुद्रूक येथील आवारात झाडे झुडपे व गवत वाढल्यामुळे अस्वच्छ झाले होते. ते बघून गावातील विशाल नारखेडे, स्वप्नील चोपडे, महादेव वराडे, हरी पाटील, अमोल कांडेलकर, महादेव भोंगर, वैभव तायडे, निखिल चोपडे, योगेश खांजोडे, वैभव भंगाळे, सुबोध इंगळे, संदीप संभारे, राहुल इंगळे, शंकर तायडे, अरुण सोनवणे, संतोष पाटील, स्वप्नील चोपडे, मुकेश कांडेलकर या युवकांनी स्वत: कुदळ फावडे तसेच टिलर आणून संपूर्ण शाळेच्या आवारातील वाढलेले गवत तसेच झाडेझुडपे कापून साफसफाई केली. एवढेच नव्हे तर झाडून पूर्ण परिसर स्वच्छ केला.
याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष राजू कांडेलकर, मुख्याध्यापक भटू वाडीले, किशोर सुलताने, राहुल ठवरे, सुधीर मांजरे, विनायक वाडेकर हे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.



 

Web Title: Students worked hard to clean the ZP school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.