तासं-तास रिडींगला न बसता बागेतच बनविली अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:38 PM2019-11-16T21:38:24+5:302019-11-16T21:44:50+5:30
जळगाव - ग्रंथालयात पुस्तक घेऊन तासं-तास अभ्यास करीत असताना अनेकवेळा विद्यार्थ्यांना कंटाळा येतो़ दरम्यान, रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा कंटाळा ...
जळगाव- ग्रंथालयात पुस्तक घेऊन तासं-तास अभ्यास करीत असताना अनेकवेळा विद्यार्थ्यांना कंटाळा येतो़ दरम्यान, रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा कंटाळा दूर करण्यासाठी चक्क ‘बागेतील अभ्यासिका’ उपक्रमातंर्गत शनिवारी महाविद्यालयाच्या बागेतचं अभ्यासिका बनवून निसर्गरम्य वातावरणात अभ्यास करण्याचा आनंद घेतला.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठाने विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केल्याने सर्व विध्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहे. घर असो की कॉलेज प्रत्येक विध्यार्थी आपल्या वर्गात शिकवलेल्या बाबीचा अभ्यास करताना दिसत आहे. या अनुषंगाने जी. एच. रायसोनी महाविध्यालयाकडून बागेतील अभ्यासिका हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची निसर्गरम्य वातावरणात संधी मिळावी, म्हणून हा जिल्ह्यातील पहिला प्रोजेक्ट कॅम्पसमध्ये सुरु करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांकडून परीक्षांची तयारी
महाविद्यालयाच्या आवारात रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालय, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालय, रायसोनी कनिष्ट महाविध्यालय, रायसोनी पॉलिटेक्निक यासारख्या वेगवेगळ्या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच वस्तीगृहातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी येथे स्टडी क्लब हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. या माध्यमातून महाविद्यालयातील ग्रंथालय मुलांसाठी २४ तास सुरु ठेवण्यात येते. परंतु ग्रंथालयातून पुस्तक घेऊन तासनतास रिडींग रुममध्ये अभ्यास करण्याचा मुलांना कंटाळा येऊ शकतो, हे लक्षात घेऊन बागेतील अभ्यासिका हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामुळे विविध अभ्यासक्रमाचे विध्यार्थी एकत्र येत असून त्यांच्या अभ्यासक्रमातील विविध पैलूमुळे नवनिर्मिती व इंटरडीसीप्लीनरी येण्यास मदत होत आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मकरंद वाठ, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया, प्रा. भूषण राठी, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. गौरव संचेती, डॉ. दीपक शर्मा, जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील हे परिश्रम घेत आहेत.