ममुराबाद येथील उपकेंद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:31+5:302021-05-22T04:15:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : ग्रामपंचायतीसह ममुराबाद विकास मंच व 'लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शनिवारपासून कोविड प्रतिबंधक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायतीसह ममुराबाद विकास मंच व 'लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर
गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शनिवारपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण
सुरू होणार आहे. आरोग्य विभागाने त्यासाठी आवश्यक ती जय्यत तयारीसुद्धा
केली आहे.
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आयोजित
लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन ममुराबाद येथील सुमारे ३८८ नागरिकांनी कोविड
प्रतिबंधक लस आतापर्यंत घेतली आहे. मोठ्या लोकसंख्येचा विचार करता जवळपास
संपूर्ण गाव अजूनही लसीपासून वंचित असल्याने येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड
लसीकरणाची व्यवस्था करण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे
निवेदनाद्वारे करण्यात आली होती. 'लोकमत'नेही त्यासंदर्भात वृत्त प्रकाशित
करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. अखेर उशिरा का होईना ममुराबाद येथे
लसीकरणाची सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळण्याची
शक्यता आहे. दरम्यान, लसीकरणाचा लाभ ४५ वर्षे वयावरील नागरिकांनाच देण्यात
येणार असल्याची माहिती धामणगाव आरोग्य केंद्राच्या सूत्रांनी 'लोकमत'शी
बोलताना दिली.