10 हजारांची लाच मागणे भोवले, पोलीस उपनिरीक्षक व हवालदारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:06 PM2021-06-10T17:06:04+5:302021-06-10T17:06:40+5:30
पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (५६, रा.भिरूड कॉलनी,भुसावळ) आणि पोकॉ. गणेश महादेव शेळके (३१, रा.पोलीस वसाहत,वरणगाव ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जळगाव : वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वरणगाव येथील पोलीस उपनिरीक्षक आणि लाच घेणारा हवालदार अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (५६, रा.भिरूड कॉलनी,भुसावळ) आणि पोकॉ. गणेश महादेव शेळके (३१, रा.पोलीस वसाहत,वरणगाव ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालकीचे डंपरद्वारे वाळूची वाहतूक केली जाते. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी पीएसआय वाणी याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर लाचेची ही रक्कम पोकॉ. गणेश शेळके याने घेतली. त्याने रक्कम घेताच पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या लाच लुचपतप्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली.