उपअधीक्षकांच्या पथकाचे जळगावातील अवैध धंद्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 06:08 PM2017-04-21T18:08:53+5:302017-04-21T18:08:53+5:30
तीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त : समता नगर, संतोषी माता चौकात कारवाई
Next
जळगाव,दि.21- शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे व परिविक्षाधीन उपअधीक्षक डॉ.संतोष गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी रात्री शहरात अवैध धंद्याविरुध्द कारवाईची माहीम राबविली. समता नगर,संतोषी माता चौक व झाशीची राणी चौक या तिन ठिकाणी जुगार व सट्टा अड्डय़ावर धाड टाकण्यात आली. त्यात 15 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तीन लाखाच्या जवळपास मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईची स्थानिक पोलिसांना मात्र पथकाने खबर लागू दिली नाही.