फुकट्या प्रवाशांकडून सव्वादोन लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:07 PM2019-11-20T23:07:48+5:302019-11-20T23:09:31+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे रावेर रेल्वेस्थानकावर ‘बस रेड तिकीट चेकिंग’ या कारवाई सत्रांतर्गत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून पथकाने बुधवारी दोन लाख २४ हजाराचा दंड वसूल केला.
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातर्फे रावेर रेल्वेस्थानकावर ‘बस रेड तिकीट चेकिंग’ या कारवाई सत्रांतर्गत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून पथकाने बुधवारी दोन लाख २४ हजाराचा दंड वसूल केला.
वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक नियुक्त होते. यात ७ रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच तीसपेक्षा जास्त तिकीट निरीक्षकांचा सहभाग होता. रेल्वेस्थानकावर राबवण्यात तपासणी अंतर्गत ४०६ विनातिकीट प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांवर तसेच सामान्य तिकिटावरून आरक्षित डब्यामध्ये, एसी डब्यामध्ये प्रवेश करणारे क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाºया प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. याद्वारे दोन लाख २४ हजार ८२५ दंड या प्रवाशांना ठोठावण्यात आला. या मोहिमेत मुख्य तिकीट निरीक्षक वाय. डी. पाठक, एटीएस स्काँड, सजग स्कॉड, ओडी स्टाफ व अन्य तिकीट निरीक्षक, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
काहींनी ठोकली धूम
रावेर स्टेशनवर गाडी थांबवून ही तपासणी मोहीम अचानक सुरू झाल्याने प्रवासी वर्गाची धावपळ उडाली. प्रवासाचे तिकीट न काढलेल्या काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरून धूम ठोकली तर आरक्षणाच्या डब्यातील काही जणांनी विरूद्ध दिशेने उतरून पळ काढला.