तोतया उपजिल्हाधिका:याने ग्रामस्थांना व शिक्षकांनाही बनविले ‘मामा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:00 PM2017-07-23T12:00:42+5:302017-07-23T12:00:42+5:30
तोतया उपजिल्हाधिकारी समाधान केवल जगताप (वय 28 रा.नाशिक) याने त्याच्या चौगाव, ता.बागलाण, जि.नाशिक या मुळ गावातील लोकांना व शिक्षकांनाही मामा बनविल्याचे तपासात उघड झाले आहे.
Next
ऑ लाईन लोकमतजळगाव, दि. 23 - तोतया उपजिल्हाधिकारी समाधान केवल जगताप (वय 28 रा.नाशिक) याने त्याच्या चौगाव, ता.बागलाण, जि.नाशिक या मुळ गावातील लोकांना व शिक्षकांनाही मामा बनविल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड, कॉन्स्टेबल महेंद्र बागुल व रवी नरवाडे यांचे एक पथक शनिवारी जगताप याला घेऊन नाशिक येथे गेले होते.चौगाव येथे त्याने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी शाळेत स्टेरीओ व एम्प्लीफायर भेट दिलेले असून त्यावर स्वत:च्या नावासह तहसीलदार असा पदाचा उल्लेख केला आहे. आपण तहसीलदार असल्याचे त्याने गावकरी व तेथील शिक्षकांना सांगितले आहे. यावेळी त्याने गावक:यांसोबत थाटात भाषणही ठोकले होते. आई, वडील गावात शेती काम करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. मुलाचे कारनामे पाहून त्यांनाही धक्का बसला आहे. तसेच प}ीही आश्चर्य चकीत झाली.चौगाव येथून आल्यावर पथक अमळनेर येथे आले. तेथे विश्रामगृहातील त्याच्या नोंदी तपासल्या, मात्र दोनच तास थांबल्यामुळे त्याने रजिस्टवर नोंद केलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी त्याचे मोबाईल रेकॉर्ड मागविले असून तो कोणाच्या संपर्कात होता. त्याने कोणाकोणाला ‘मामा’ बनविले आहे, याचीही चौकशी केली जात आहे.