सबगव्हानला नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 07:28 PM2019-04-26T19:28:15+5:302019-04-26T19:29:00+5:30

स्वत:च्या शेतात घेतला गळफास

Subgavan suffers from depression | सबगव्हानला नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

सबगव्हानला नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Next


अमळनेर : सबगव्हान येथील दगडू वेडू पाटील (वय २८) या तरुणाने लग्न जमत नसल्याने नैराश्यातून दिनांक २६ रोजी पहाटे स्वत: चे शेतात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या घटनेबाबत माहिती अशी की, दगडू हा अमळनेर येथील नेत्ररोगतज्ञ डॉ. नरेंद्र महाजन यांच्याकडे नऊ हजार रुपये महिन्याने कामावर होता. या तरुणाकडे फक्त दोन एकर शेती असल्याने तो बाहेर कामावर होता. गावात साधे घर व कमी जमीन असल्याने लग्न जुळून येत नव्हते म्हणून तो नैराश्याने ग्रासलेले होता. रोजी रोटी साठी कमवून ही मुलगी मिळत नाही व लग्न जुळून येत नाही म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या नावे असलेल्या सबगव्हान शिवारातील शेतातील निंबच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन पहाटे आपली जीवनयात्रा संपविली. २६ रोजी सकाळी ८ वाजता गावातील शेतकरी अविनाश भीमराव पाटील हे शेतात काम करण्यासाठी जात असताना त्यांना दगडू याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी गावात ही माहिती दिली तसेच पोलिसानाही कळविण्यात आले. यानंतर मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहाय्यक फौजदार रोहिदास जाधव, हवालदार भास्कर चव्हाण यांनी घटनास्थळी शेतात जाऊन पाहणी करून पंचनामा केला व दगडूचे वडील आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आल्यावर दुपारी ५ वाजता सबगव्हान येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भास्कर चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Subgavan suffers from depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.