अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी १८ पर्यंत अर्ज सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:57+5:302021-02-06T04:28:57+5:30

जळगाव : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार असून यासाठी निकषात बसणाऱ्या उमदेवारांनी १८ फेब्रुवारीपर्यंत ...

Submit up to 18 applications for the post of Anganwadi worker, helper | अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी १८ पर्यंत अर्ज सादर करा

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी १८ पर्यंत अर्ज सादर करा

googlenewsNext

जळगाव : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यात येणार असून यासाठी निकषात बसणाऱ्या उमदेवारांनी १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यवेक्षिकांचीही अनेक पदे रिक्त आहेत. मात्र, अद्याप ही पदे भरण्याची शासनाकडून मंजुरी नसल्याची माहिती जि. प. महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी दिली.

चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द, वरखेडे खुर्द, पिंपळवाड निकुंभ, लोंजे, गंगाआश्रम, एकलहरे, चांभार्डी बुद्रूक, वाघडू तर गणेशपुर येथे मदतनीस, एरंडोल तालुक्यातील वनकोठे, पातरखेडा, भालगाव, कढोली, जवखेडे सिम, उत्राण अ. ह. येथे अंगणवाडी सेविका तर जानफळ, कनाशी, दौलतपुरा, आडगाव तांडा येथील प्रत्येकी एक मिनी अंगणवाडी सेविका, रावेर तालुक्यातील मुंजलवाडी व चोरवड, गुलाबवाडी, सहस्त्रलिंग, बोरखेडासीम येथे अंगणवाडी सेविका तर पाल येथे मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

Web Title: Submit up to 18 applications for the post of Anganwadi worker, helper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.