पीक विम्याचा लाभ होण्यासाठी नुकसानीची माहिती त्वरित सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:52+5:302021-06-01T04:12:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात ...

Submit loss information immediately to benefit from crop insurance | पीक विम्याचा लाभ होण्यासाठी नुकसानीची माहिती त्वरित सादर करा

पीक विम्याचा लाभ होण्यासाठी नुकसानीची माहिती त्वरित सादर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात पीक विम्याचा लाभ होण्यासाठी त्यांनी त्वरित माहिती सादर करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

२०२०-२१ करिता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत आता अंबिया बहाराकरिता मोसंबी, डाळिंब, केळी व आंबा या पिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. तसेच पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केळी व आंबा या पिकांसाठी लागू आहे.

जिल्ह्यात गुरुवार व शनिवारी अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती विमा कंपनी व कृषी विभागास (तालुकास्तरावर) त्वरित कळविणे आवश्यक आहे, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधीत विमा कंपनी, महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे पंचनामे त्वरित करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

Web Title: Submit loss information immediately to benefit from crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.