मनुष्यबळाचे विवरणपत्र सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:31+5:302021-01-09T04:13:31+5:30
जळगाव : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन, राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच ...
जळगाव : सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन, राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना (ज्यांचेकडे 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी) कार्यरत आहेत. अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादी यांनी त्यांच्याकडील माहे ऑक्टोबर ते डिसेबर २०२० या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-१) ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करावे.
आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. असे डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेत बदल
जळगाव : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे दररोज दोन सत्रात चालु असतात. सुधारीत कामकाजाच्या वेळा ७ जानेवारीपासून पासून अंमलात आणण्यात आल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते दुपारी ४.३० वा. आणि शनिवार सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुपालकांना आकस्मिकप्रसंगी २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.