प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:52+5:302021-02-14T04:15:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक ...

Submit proposals for pending irrigation projects | प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर करा

प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. त्याचबरोबर प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आढावा बैठक येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, मुख्य अभियंता एम. एस. आमले, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब घोरपडे, कार्यकारी अभियंता गोकूळ महाजन, नितीन पोटे, विश्वास दराडे, तुषार चिनावलकर, एल.एम. शिंदे, रजनी देशमुख, अदिती कुलकर्णी, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, रवींद्र पाटील उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पात येत्या तीन वर्षात पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक कामाचे नियोजन करावे. तसेच यासाठी दरवर्षी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करावे. या धरणाच्या डिझाईनचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करा. त्याचबरोबर जिल्ह्यातील वरखेड लोंढे धरण क्षेत्रास वाळूक्षेत्र घोषित करून याठिकाणी होणाऱ्या वाळू साठ्याच्या विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यास वापरण्याबाबत तपासणी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे मुक्ताई उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचे नुकसान झाले असून याची महामार्ग विभागाकडून भरपाई मिळणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले असता, मंत्री पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना तातडीने बोलवून घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करण्याची सूचनाही त्यांनी बैठकीत दिली.

बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वाघूर प्रकल्प, शेळगाव बॅरेज, वरखेड-लोंढे, सुलवाडे-जामफळ, महाकाय पुनर्भरण योजना, गिरणा नदीवरील ७ बंधारे, नर्मदा-तापी वळण योजना, नार-पार गिरणा वळण योजना, बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, वरणगाव- तळवेल उपसा सिंचना योजना, निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ब्रिटिशकालिन फड बंधारे, भागपूर उपसा सिंचन योजना आदी प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Submit proposals for pending irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.