वनजमीन परस्पर विक्री प्रकरणाचा अहवाल एक महिन्यात सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:13 PM2018-10-21T12:13:00+5:302018-10-21T12:14:11+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव : जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमिनीची परस्पर विक्री प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. समितीने याबाबत चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवारातील वनविभागाच्या जमीन परस्पर विक्री झाल्याच्या प्रकरणास ‘लोकमत’ने वाचा फोडली. १०० कोटींहून अधिक असलेल्या या जमीन घोटाळ्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चौकशी समितीची स्थापना केली आहे.
या बाबत समिती अध्यक्ष व सदस्यांना जिल्हाधिकाºयांनी पत्र देऊन तक्रारदार आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याबाबत सूचित करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशी आहे चौकशी समिती
अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांंची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तहसीलदार अमोल निकम (जळगाव), भाऊसाहेब थोरात (भुसावळ), सहायक वन संरक्षक आर.एस. दसरे, वन परिक्षेत्र अधिकारी एन.जी. पाटील (जळगाव), आशुतोष बच्छाव (मुक्ताईनगर) यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.