शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:32 AM2018-09-08T00:32:31+5:302018-09-08T00:32:54+5:30
फैजपूर विभागातील स्थिती : अनेक शेतकऱ्यांनी खाती क्रमांकच दिले नाही
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांनी अनुदानासाठी बँक खाते क्रमांक जमा करावे यासाठी फैजपूर मंडळ कार्यालयातर्फे बैठक घेण्यात आली. शेतकºयांनी बँक खाती क्रमांक दिले नसल्याने अनुदान पडून असल्याचे चित्र आहे. २५ सप्टेंबरपर्यंत संबंधित शेतकºयांनी आपले बँक खाते क्रमांक जमा करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.
सण २०१७-१८ या खरीप हंगामातील कापूस लागवड केलेल्या शेतकºयांच्या कापूस पिकावर बॉंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले होते. या शेतकºयांनी नुकसानभरपाई मिळावी यासाठी मागणी केल्याने पंचनामे करण्यात आले होते. फैजपूर शिवारात एकूण ४३९ पंचनामे करण्यात आले होते. यापैकी अद्यापपावेतो २४२ नुकसानग्रस्त शेतकºयांनी बँक खाते जमा केलेले नाही.
त्या नुकसान भरपाईचे अनुदान यावल तहसील कार्यालयात पडून आहे. हे अनुदान बँक खात्यावर जमा करण्यासाठी त्यांच्याकडून बँक खाते क्रमांक अद्याप तलाठी कार्यालयात जमा करण्यात आले नाही म्हणून बँक खात्यांअभावी शासनाचे हे अनुदान परत जाऊ नये म्हणून गुरुवारी फैजपूर पालिका सभागृहात बैठक झाली. फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी. भंगाळे अध्यक्षस्थानी होते.
२५ सप्टेंबरपर्यंत कापूस बोंडअळीग्रस्त शेतकºयांनी आपले बँक खाते क्रमांक तलाठी कार्यालयात जमा करावे. बँक खाते मुदतीत जमा न झाल्यास हे अनुदान शासन जमा होणार असल्याचे फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी. भंगाळे यांनी सांगितले.
या वेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कलीम खान हैदर, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे होते.
बैठकीला जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, देवेंद्र साळी, चंद्रशेखर चौधरी, रवींद्र होले, पप्पू चौधरी भाजपा शहराध्यक्ष संजय रल, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद कौसर अली, शेख इरफान, राकेश जैन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यशस्वितेसाठी तलाठी एफ.एस.खान, डी.एल.तायडे, संजय राजपूत, आमोदे तलाठी एम.पी.खुर्दा यांनी परिश्रम घेतले.