कपाशीला मिळणार अनुदान

By admin | Published: March 23, 2017 12:08 AM2017-03-23T00:08:26+5:302017-03-23T00:08:26+5:30

२ कोटी ८२ लाख रु.प्राप्त : भडगाव तालुक्यातील शेतकºयांना दिलासा

Subsidy grant | कपाशीला मिळणार अनुदान

कपाशीला मिळणार अनुदान

Next

भडगाव : २०१५ मध्ये खरीप हंगामात ज्या शेतकºयांनी कापूस पिकाचा विमा काढलेला नाही. अशा शेतकºयांना शासनाकडून कापूस पिकासाठी अनुदान मिळणार आहे. यासाठी तहसील प्रशासनास २ कोटी ८२ लाख ३ हजार ५९६ रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. प्रशासनाची शेतकºयांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे.
२०१५ मध्ये खरीप हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. त्यावेळी काही शेतकºयांनी कापूस पिकाचे विमा काढलेला होता मात्र ज्या शेतकºयांचा कापूस पिकाचा विमा काढलेला नव्हता अशा शेतकºयांना आता शासनाकडून कापूस पिकासाठी अर्थसाहाय्य अनुदान मिळणार आहे. यासाठी भडगाव तहसील विभागास २ कोटी ८२ लाख ३ हजार ५९६ रुपये अशी अनुदानाची रकम नुकतीच प्राप्त झाली आहे, यासाठी दोन हेक्टरची शेतकºयांना मर्यादा आहे. तालुक्यातील शेतकºयांना कापूस वाटपाच्या कार्यवाहीचे नियोजन सुरु असून हे अनुदान संबंधित लाभधारक शेतकºयांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयातील लिपिक गणेश नाईक यांनी दिली.
अनुदान वाटपाबाबत तहसील सी.एम.वाघ यांनी मंडळाधिकारी तलाठी यांच्या बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.  २०१५ मध्ये ज्या शेतकºयांनी खरीप हंगामात कापूस पिकाचा विमा काढलेला नाही अशा लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तहसील कार्यालयात जमा कराव्यात असे आदेश तहसीलदार वाघ यांनी तलाठींना केले आहे. त्यामुळे कापूस अनुदानाचा लाभ पात्र शेतकºयांना लवकरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांना अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे.

कापूस पिकाच्या अनुदानाचे वितरण शेतकºयांना शासन निर्णयानुसार  करण्यात येणार आहे.  तसेच अनुदान वाटप करताना महसूल मंडळाप्रमाणे  शेतकºयांना प्रति हेक्टरी देय अनुदानाचा  दर रक्कम याप्रमाणे लाभ मिळणार आहे.  यात मंडळाचे नाव व पुढे अनुदानाच्या रकमेचा दर याप्रमाणे आहे. यात  भडगाव महसूल मंडळ २३१६ रुपये प्रति हेक्टरी, कोळगाव महसूल मंडळ १९५३ रुपये कजगाव महसूल मंडळ २४७९ रुपये, आमडदे महसूल मंडळ १८६५ रुपये याप्रमाणे प्रति हेक्टरला अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
२०१५च्या खरीप हंगामात ज्या शेतकºयांनी कापूस पिकाचा विमा काढलेला नाही. अशा शेतकºयांना कापूस उत्पादनाचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत तहसील प्रशासनास  २ कोटी ८२ लाख ३ हजार ५९६ रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. नव्याने पुन्हा १ कोटी रुपये रकमेची अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली आहे.
- सी.एम.वाघ,
तहसीलदार भडगाव

Web Title: Subsidy grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.