चेन्नइतील नृत्य स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:37+5:302021-02-14T04:15:37+5:30

भादली रेल्वे गेट सोमवारी बंद राहणार जळगाव : भादली-जळगाव रेल्वे फाटक तांत्रिक कामासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ...

Success in dance competition in Chennai | चेन्नइतील नृत्य स्पर्धेत यश

चेन्नइतील नृत्य स्पर्धेत यश

Next

भादली रेल्वे गेट सोमवारी बंद राहणार

जळगाव : भादली-जळगाव रेल्वे फाटक तांत्रिक कामासाठी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत बंद राहणार आहे. परिणामी या वेळेत गेटवरील वाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.

समृद्धी संतचा सत्कार

जळगाव : थोरवी महिला मंडळातर्फे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमात राजपथावर पथसंचलन करणारी समृद्धी संतचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा निला चौधरी, संध्या कोल्हे, प्रांजली देशमुख, मनीषा नाले उपस्थित होते. सूत्रसंचालन स्मिता पाटील तर आभार ज्योती चौधरी यांनी मानले.

माळी समाजाचा २८ रोजी परिचय मेळावा

जळगाव : महाराष्ट्र माळी समाज महासंघातर्फे २८ फेब्रुवारीला शहरातील लाठी शाळा येथे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी मेळाव्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी १८ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभरातील माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात आले आहेत. तरी समाज बांधवांनी संबंधित पदाधिकाऱ्यांकडे नावे नोंदविण्याचे आवाहन माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केले आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी

जळगाव : शनिवारी दुपारी अजिंठा चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. या वाहनधारकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीसही जागेवर नसल्यामुळे, काही वाहनधारकांनी स्वत: वाहने बाजूला करून कोंडी सोडविली.

Web Title: Success in dance competition in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.