आयसीएसई बोर्डाच्या `अनुभूती`च्या विद्यार्थांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:25+5:302021-07-26T04:16:25+5:30
जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. यात ...
जळगाव : अनुभूती निवासी स्कूलच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. यात बारावीच्या परीक्षेत सूरज चौधरी या विद्यार्थाने ९४.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच आनंद राका याने ९१ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
एकूण ३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या शैक्षणिक वर्षात सायन्सचे ५, तर कॉमर्स शाखेचे २५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत `बेस्ट ऑफ फाईव्ह` पद्धतीनुसार राशी चांबोळे या विद्यार्थिनीने ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे, तर हर्षिल बोथरा याने ९५.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. दहावीसाठी एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. हर्षिल बोथरा आणि अनुज अग्रवाल या दोन्ही विद्यार्थ्यांनी गणित विषयात १००पैकी १०० गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन व अनुभूतीच्या संचालिका नीशा जैन यांनी यशस्वी विद्यार्थांचे कौतुक केले.