जैन विद्यालयाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:43+5:302021-08-23T04:18:43+5:30

विद्यालयाने आपली दैदिप्यमान यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयातून ११ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण ...

Success in Jain Vidyalaya's NMMS Scholarship Examination | जैन विद्यालयाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जैन विद्यालयाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश

googlenewsNext

विद्यालयाने आपली दैदिप्यमान यशाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयातून ११ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांमध्ये पुष्कर सुनील सोनार, यश रवींद्र जाधव, कल्याणी सुरेश चौधरी यांचा समावेश असून या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत प्रतिवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये म्हणजे चार वर्षात एका विद्यार्थ्याला ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष यू. एच. करोडपती, सचिव डॉ. सचिन बडगुजर व सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक नितीन बडगुजर यांचे मार्गदर्शन लाभले.

220821\22jal_1_22082021_12.jpg

जैन विद्यालयाचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश 

Web Title: Success in Jain Vidyalaya's NMMS Scholarship Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.