राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:39+5:302021-04-02T04:16:39+5:30
जळगाव : दुर्ग, छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. ...
जळगाव : दुर्ग, छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंनी यश मिळवले आहे. त्यात जळगावचे पाच खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवले. शुभम मोतीलाल रायसिंग याने स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाचा किताब देखील पटकावला. त्याने डेडलिफ्ट प्रकारात हे यश मिळवले.
अश्विन रवी नायर याने देखील सुवर्ण पदक पटकावले. तर दिपाली वाघोदे हिने डेड लिफ्ट प्रकारात रौप्य आणि प्रफुल्ल निकम याने बेंच प्रेस प्रकारात कांस्य पदक पटकावले. यास्पर्धेत कुणाल गोयर हे संघ व्यवस्थापक होते. तर सर्व खेळाडूंना रमेश बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे कौतुक रुपेश पाटील,प्रकाश सपकाळे, डॉ. विकास बोरोले, डॉ. शांताराम सोनवणे, ॲड. निकेश चौधरी, रमेश बनकर, दीपक खैरे, बापु कोळी, योगेश सपकाळे यांनी कौतुक केले आहे.