भुसावळला पोलीस वसाहतीत बंद हातपंप सुरू करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 07:59 PM2019-05-17T19:59:42+5:302019-05-17T20:00:51+5:30

यावर्षी हतनूर धरणात दोन टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्यामुळे भुसावळातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची करावी लागत आहे. पोलीस वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला हातपंप उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पुढाकार घेतल्यामुळे तो सुरू करण्यात यश आले आहे.

Success in launching closed handpumps in Police colony of Bhusaval | भुसावळला पोलीस वसाहतीत बंद हातपंप सुरू करण्यात यश

भुसावळला पोलीस वसाहतीत बंद हातपंप सुरू करण्यात यश

Next
ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षकांचे प्रयत्नपोलीस कर्मचाऱ्यांची तूर्त पाण्यासाठी भटकंती थांबणार

भुसावळ, जि.जळगाव : यावर्षी हतनूर धरणात दोन टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्यामुळे भुसावळातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची करावी लागत आहे. पोलीस वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला हातपंप उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पुढाकार घेतल्यामुळे तो सुरू करण्यात यश आले आहे.
पोलीस वसाहतीत अनेक वर्षांपासून हातपंप बंद अवस्थेत पडलेला होता. या ठिकाणी राहणाºया पोलीस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यापुढेही येणारी परिस्थिती ही दुष्काळी आहे. यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास पवार यांनी पुढाकार घेतला आणि बंद पडलेल्या हातपंपाला सुरू केले.
या हातपंपाला विद्युत मोटार पंप बसवून पोलीस वसाहतीचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. यानंतर गजानन राठोड यांनी हातपंपाचे बटन दाबून उद्घाटन केले. यामुळे भविष्यात येणाºया पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ पोलीस वसाहतमधील कर्मचाºयांवर येणार नाहीे. यासाठी एएसआय तस्लीम पठाण, एएसआय युवराज नागरुत, राजू परदेशी, कादर तडवी, छोटू वैद्य व पोलीस कर्मचाºयांनी हातपंप सुरू करण्यासाठी सहकार्य केले़

Web Title: Success in launching closed handpumps in Police colony of Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.