नचिकेत पाटीलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:01+5:302021-07-07T04:21:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रज्ञाशोध परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ...

Success of Nachiket Patil | नचिकेत पाटीलचे यश

नचिकेत पाटीलचे यश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रज्ञाशोध परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी नचिकेत राहुल पाटील याने २०० पैकी १६४ गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्याला मुख्याध्यापक गोकूळ महाजन, व्यवस्थापक जितेंद्र कापडे, दीपक भावसार आदींची मार्गदर्शन लाभले.

००००००००००००

फोटो- ०७ सीटीआर २८

शर्मिष्ठाने पटकाविले कास्यपदक

जळगाव : डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी शर्मिष्ठा राहुल पाटील हिने कास्यपदक पटकाविले आहे.

टिकाऊ इकोफ्रेंडली फूड पॅकिंग या व्यापक संकल्पनेत शर्मिष्ठाने अन्न पॅकेजिंग साहित्य म्हणून उसाच्या मळीपासून प्लेट आणि वाटी निर्मितीची निवड करून तिने एक मार्ग सुचविला. ज्याद्वारे आपण उसाच्या मळीपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून शेवटी त्या वस्तूंचा मातीत खत म्हणून वापर केला जाऊ शकतो. या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक गोकूळ महाजन, व्यवस्थापक जितेंद्र कापडे, दीपक भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Success of Nachiket Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.