जनसेवा आणि पक्षकारांनी दिलेल्या संधीनेच यश - अॅड. अजय तल्हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 01:13 PM2020-07-19T13:13:01+5:302020-07-19T13:13:18+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केले मोठे काम
जनसेवा आणि पक्षकारांनी सातत्याने मला जी सेवेची संधी दिली, त्यामुळेच आज मला यश मिळाले असल्याचे केंद्र सरकारचे नवे असिस्टंट सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अॅड. अजय तल्हार यांनी म्हटले आहे. अॅड. तल्हार हे मुळचे जळगावचे आहेत. सध्या ते औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात मुंबई उच्च न्यायालयात मार्च १९९६ मध्ये केली. नंतर वर्षभराने ते औरंगाबादला आले. आणि येथेच काम करु लागले. या काळात त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला. त्यासोबतच त्यांनी अनेक जनहित याचिकांमध्ये काम पाहिले.
प्रश्न : या पदापर्यंत तुम्ही कसे पोहचलात, आणि नंतर कुटुंबियांची प्रतिक्रीया काय होती.
अॅड.तल्हार : हे पद म्हणजे, केंद्र सरकारच्या कायदेशीर सल्लागाराचे आहे. त्याचे कार्यक्षेत्र उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ हे आहे. त्याअंतर्गत येणाºया जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची जी काही न्यायीक प्रकरणे असतील. त्यावर सल्ला देणे आणि बाजु मांडणे हे काम आहे.
केंद्र सरकारकडूनच त्यासाठी नामाकंन केले जाते आणि मग नियुक्ती होते. कुटुंबाला आनंद झाला. पण सोबतच जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. आता आणखी जोमाने काम करावे लागेल.
प्रश्न : अनेक जनहित याचिका किंवा गरिबांच्या प्रकरणांमध्ये तुम्ही अल्प फी घेतात, त्यावर काय सांगाल.
अॅड.तल्हार : मी स्वत: जन या संकल्पनेचा भाग आहे. जनहित याचिका ही सर्वांच्या फायद्याची असते. त्यामुळे मी त्यात फी घेत नाही.
गरिबांच्या अनेक केसेसमध्ये तर मी त्याचा खर्च देखील करतो. त्याची क्षमता बघुनच पैसे घेतो किंवा घेतच नाही.
तुम्ही शेतकरी समस्यांवर काम केले आहे. त्यांच्या आवाज उठवला आहे. त्यात नेमके कसे कार्य केले ?
अॅड. तल्हार : भारताच्या घटनेतच तरतुद आहे की शेतकरी, ग्राहक आणि शासन यांचे म्हणणे मान्य करून शेतमाला भाव ठरवावा.
मात्र तसे होत नाही. शेतमालावर नियंत्रण असावे,यासाठी किसान संघाने लढा उभारला. त्यात मी काम केले. हा लढा कायदेशीर पद्धतीने सोडवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. त्याचा निकाल लागला आणि त्याचाच परिपाक म्हणून निती आयोगानेही प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने दोन अध्यादेशही काढले आहेत.
शेतकºयांच्या आणि गरिबांच्या प्रश्नांवर जे मांडले. त्याचा फायदा झाला. आता कामही वाढले आहे आणि जबाबदारी देखील.
शेतकºयांच्या प्रश्नांवर काम केले.तसेच अनेक मोठमोठ्या प्रकरणात प्रसिद्ध राजकारणी, नेते, उद्योजक यांचीही बाजु मांडली. उद्योग क्षेत्राशी संबधीत एका प्रकरणात बाजु मांडली होती. त्यात मोठे यश मिळाले त्याचा फायदा कारकिर्दीत पुढे झाला - अॅड. अजय तल्हार, असिस्टंट सॉलिसिटर जनरल