ज्ञानेश्वरी स्पर्धेत भगीरथच्या सात विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:29 PM2021-03-04T20:29:41+5:302021-03-04T20:30:11+5:30
जळगाव : किरणदेवी सारडा सत्कार्य निधीच्यावतीने नुकतीच ज्ञानेश्वरी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन ...
जळगाव : किरणदेवी सारडा सत्कार्य निधीच्यावतीने नुकतीच ज्ञानेश्वरी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून रोख पारितोषिक पटकाविले.
यावेळी स्पर्धेत शाळेतील ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी अध्याय क्रमांक ८ मधील १ ते १०० ओव्याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे अभ्यास करून स्पर्धेत सहभाग घेवून शाळेतील सात विद्यार्थ्यांनी रोख पारितोषिक पटकाविले. त्यामध्ये व्यंकटेश विजय सोनवणे, निकिता राजेंद्र सपकाळे, रोशनी लालचंद सोनवणे, नंदिनी नितीन सावंत, जयेश चंद्रकांत तायडे, तेजस लखपती कोळी, यश रवींद्र बारी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका अलका पितृभक्त यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थापध्यक्ष यांनी कौतुक केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता पाटील यांनी केले तर आभार नरेश फेगडे यांनी मानले.