जळगाव जिल्ह्यात कोरोनावर यशस्वी मात, किती जण झाले बरे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:28 PM2020-07-13T12:28:52+5:302020-07-13T12:29:41+5:30
दिलासादायक चित्र
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे २०० च्या टप्प्यात सातत्याने वाढत असतानाही बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात वाढले आहे़ या कालावधीत ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण उपचार घेत असून ५९ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़
जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत आहे़ काही दिवसांपूर्वी एका ९० वर्षीय वृद्धांनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती़ त्यामुळे कोरोना हा बरा होणारा आजार असून लवकर रुग्णालयात गेल्यास यातून रुग्ण बाहेर पडू शकतो, अशी जिल्हाभरात ३३८३ उदाहरणे आहेत़
मृत्यूदर साडेपाच टक्क्यांवर
जिल्ह्याचा मृत्यूदर हा थेट १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता़ मध्यंतरीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या व रुग्णसंख्या समोर येत गेल्याने हा मृत्यूदर ५.६ टक्क्यांवर आला आहे़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़
७५ टक्के निगेटिव्ह
ज्या चाचण्या रोज होत आहेत़ त्यापैकी जवळपास ७५ टक्के अहवाल हे निगेटीव्ह येत आहेत, त्यामुळे हे देखील एक दिलासादायक चित्र आहे़
७० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे
ज्यांना लक्षणे नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते़ सद्यस्थितीत उपचार घेणाºया रुग्णांपैकी १४२४ म्हणजेच ७० टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. तर त्या खालोखाल १२७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तर ४६९ रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे़ २२० रुग्ण अत्यवस्थ आहेत़
लवकर चाचणी, लवकर निदान व लवकर उपचार यामुळे आता पुढील गंभीर बाबी टाळता येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेलेले आहे़ यामुळे मृत्यूचे प्रमाणही घटले आहे़ शिवाय लवकर हे लोक आयसोलेट झाल्याने पुढील वाढणारा संसर्गही आटोक्यात आला येणार आहे़ रोज चाचण्यांचे प्रमाण वाढले आहेत़ त्यात जास्त अहवाल निगेटीव्ह असून काही पॉझिटीव्ह येत आहेत, मात्र, लवकर निदान होत असल्याने पुढील संसर्ग टळत आहे़
- डॉ़ एऩ एस़ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.