एचआयव्ही बधीत महिलेची यशस्वी प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:02 PM2020-12-23T21:02:50+5:302020-12-23T21:03:25+5:30
माता व बाळ सुखरूप ; नॉन कोविड सुविधेत 8 महिन्यांनी मोठे यश
जळगाव: वरणगाव येथील एचआयव्ही बाधित महिलेची शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात सिझेरियन द्वारे प्रसूती करण्यात डॉक्टरांना यश आले. माता व बाळ सुखरूप आहे. जळगावला नॉन कोविड सुविधा सुरू झाल्यानंतर साडे आठ महिन्यातील अश्या प्रकारचे हे पहिलेच सिझेरियन झाले आहे.
महिलेला सुरुवातीला वरणगाव येथे दाखल करण्यात येणार होते, मात्र जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नॉन कोविड सुविधा उपलब्ध असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली, त्यांनी तातडीने या महिलेला २१ रोजी जळगावत येथे दाखल केले. २२ रोजी परिस्थिती बघून स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेचे सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. बालरोग वीभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, भुलतज्ञ डॉ. अभिजित राणे, डॉ. प्रिया पाटील, डॉ. अश्विनी घैसास यांनी सहकार्य केले. महिलेने अडीच किलोच्या बाळाला जन्म दिला. माता व बाळ दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
बाळाची दीड महिन्याने तपासणी
बाळाच्या शरीरातील व्हायरल लोड कमी करण्यासाठी सिरप दिले जाते. बाळाची लगेच तपासणी न करता दीड महिन्यांनी एचआयव्ही तपासणी करण्यात येणार आहे. बाळ बाधित असेल च असे नाही, ते तपासणी नंतर कळेल, अशी माहिती डॉ. संजय बनसोडे यांनी दिली.