आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

By Admin | Published: April 10, 2017 12:42 AM2017-04-10T00:42:42+5:302017-04-10T00:42:42+5:30

पाटबंधारे विभाग : १०० गावांना फायदा!

Successful journey of 9 0 km of the yatra! | आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

आवर्तनाचा ९० कि.मी.चा सफल प्रवास!

googlenewsNext

धुळे : पाणीटंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून नदीपात्रात सोडलेले आवर्तन १३ दिवसांच्या प्रवासानंतर ९० कि.मी. अंतरावरील आपल्या इच्छित स्थळी पोहचले. त्यामुळे पाणी सोडण्यामागील उद्देश सफल करण्यात पाटबंधारे विभागाला बºयाच वर्षात यश लाभले. 
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद, पढावद ही गावे पार करून पाणी भिलाणे दिगर गावाच्या के.टी.वेअर बंधाºयापर्यंत पोहचले. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आवर्तनाचे पाणी गावाच्या बंधाºयापर्यंत पोहचविण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहचले. तेथून पुढे तीन कि.मी. अंतरावर संगमावर पांझरा नदी तापी नदीला मिळते.
या आवर्तनामुळे धुळे व शिंदखेडा  व अमळनेर तालुक्यातील मिळून १०० पेक्षा जास्त गावांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा झाला. यंदा आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून इतर विभागांशी समन्वय ठेवून नदीपात्रातील १९ बंधाºयांच्या फळ्या काढण्यात आल्या. त्यानंतरच आवर्तन सोडण्यात आले होते. २०० दलघफू एवढे पाणी सोडण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात १३ दिवसांत ३१० दलघफू एवढे पाणी सोडण्यात आले. त्यामुळेही आवर्तनास बळ मिळाल्याने ते वेगाने पुढे जात राहिले. त्यामुळे मार्गातील सर्व गावांना पाणी मिळाले.
अक्कलपाडा प्रकल्पात आवर्तन सोडण्यापूर्वी ५५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक होता. त्यामुळे आता केवळ १५० दलघफू एवढा मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा आवर्तनाच्या दोन दिवस आधी शिंदखेडा तालुक्यातील वाडीशेवाडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आले होते. शुक्रवारी ते शिंदखेडा शहर पाणीपुरवठा योजनेच्या कुरुक्षेत्र विहिरीपर्यंत पोहचले होते.

Web Title: Successful journey of 9 0 km of the yatra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.