क्यूअर पॉझिटिव्ह आयुर्वेद रिसर्च सेंटरची यशस्वी वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:17 AM2021-05-06T04:17:45+5:302021-05-06T04:17:45+5:30
जळगाव : संसर्गजन्य आजार पसरणाऱ्या परिस्थितीत आयुर्वेदिक औषध हे एक प्रकारचे रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. मानव ...
जळगाव : संसर्गजन्य आजार पसरणाऱ्या परिस्थितीत आयुर्वेदिक औषध हे एक प्रकारचे रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. मानव जातीला आयुर्वेदातील अमूल्य ठेवीचा परिपूर्ण लाभ भेटावा या उद्देशाने श्री दादाश्री किशोरसिंग सोलंकी हे प्रयत्न करून क्यूअर पॉझिटिव्ह आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या माध्यमातून संशोधन औषध उपलब्ध करून देत आहेत.
मधुमेहापासून मुक्तता करून देण्याचे भरीव आश्वासन ते देत आहेत. अनेकांना हाडांशी संबंधित तसेच कंबरदुखी, स्नायूदुखी, मणके व हाडांची झीज यासाठी रामबाण असे औषध व्याधीमुक्ती सेवेत घेऊन आलेले आहे. आयुष्यातील दुखणं नष्ट करण्याचे आश्वासन या माध्यमातून केले जात आहे. कोरोनासारखी महामारी अनेकांचे प्राण घेत आहे. कोरोनाचा नायनाट करण्याचा प्रामाणिक संकल्प उराशी जोपासला जात आहे. आपली रोगप्रतिकार क्षमता, निद्रा, शारीरिक बल, मानसिक स्वास्थ, गमावत आहे या सगळ्या गोष्टी काळानुरूप आपण गमावत आहोत. या सगळ्यांचा प्रभावी उपाय म्हणून सदृढ स्वास्थ प्रमुख उत्पादन मानव हिताच्या संकल्पनेने येथे केले जात आहे. असा हा लोककल्याणाच्या ठेवा आयुर्वेदिक औषधांच्या माध्यमातून आपल्याकरिता खुला करीत असून अनेक रुग्णांना संजीवनी ठरलेल्या या सर्व आयुर्वेदिक औषधी आपणालाही आरोग्यदायी ठरतील व समग्र समाज आनंदी आयुष्य जगेल, असे आश्वासन आम्ही आरोग्य दिनानिमित्त देऊ इच्छितो, तसेच भविष्यातील आरोग्यदायी व निरोगी समाजाला बघण्याचा संकल्प करत आहे, असे सांगण्यात आले. (वा.प्र.)