जिल्ह्याबाहेरील रुग्णांनावर यशस्वी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:07+5:302020-12-08T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्याबाहेरील ४६६ कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी यशस्वी उपचार करण्यात आले असून सुदैवाने यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याबाहेरील ४६६ कोरोना रुग्णांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी यशस्वी उपचार करण्यात आले असून सुदैवाने यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची नोंद आहे.
कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेने कुठल्याही सीमांचा विचार न करता उपचार पद्धती अवलंबल्याचे एक सकारात्मक चित्र यातून समोर आले आहे. कोरोनाच्या काळात सातत्याने बाहेरील रुग्णांची संख्या वाढत होती. यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७. ६३ टक्के असून मृत्यूचे प्रमाण हे शून्य आहे. नाशिक, बुलडाणा, अमरावती या भागातील हे रुग्ण आहेत. सद्यस्थितीत ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मध्यंतरी रुग्णसंख्या व त्यांच्या नोंदणीवरू संभ्रम निर्माण झाला होता. अनेक वेळा ही आकडेवारी बदलविण्यात आली होती. मात्र, आता सातत्याने दिल्या जात असलेल्या अहवालांमध्ये इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही ४६६ दर्शविण्यात आली आहे. जिल्ह्यात १३०५ एकूण मृत्यू झाले असून हे सर्व रूग्ण जळगाव जिल्ह्यातीलच आहेत.
बेडची संख्या वाढविली
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील एकत्रित बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. ही संख्या ८३०३ वरून आता ९६९७ करण्यात आली आहे. आगामी लाट, यात कुठलेली रुग्ण वाढले तरी नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. रुग्ण उपचारांसाठी सीमांचे बंधन नसून कागदपत्रे महत्त्वाची असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जाते. रुग्णाचा पत्ता व्यवस्थित असल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सोपी होते, असे सांगण्यात येत आहे.