नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:55 PM2019-01-19T23:55:13+5:302019-01-19T23:55:47+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर केली टीका

Such a battle against Narendra Modi - Chagan Bhujbal | नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

नरेंद्र मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई - छगन भुजबळ

Next

अमळनेर : राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असून या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढली आहे. निर्धार परिवर्तन यात्रेचा उद्देशच केवळ मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
चोपडा येथून निर्धार परिवर्तन यात्रा आटोपून नाशिक परत जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वरील टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, शिवाजी पाटील, सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, राज्यसभेत बहुमत असते तर संविधान बदलवून टाकू, असे बोलणारे नेते भाजपात आहेत. त्यांना संविधान मंजूर नाही, फक्त मनुवाद पसरवला जात असल्याचे सांगत या सरकारमुळे देशात असंवेदनशीलता वाढल्याचा आरोपही केला. या सरकारच्या काळात विचार स्वातंत्र्य नष्ट झाल्याचेही भुजबळ म्हणाले.
आरक्षण हा ‘चुनावी जुमला’
परिवर्तन यात्रेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश याठिकाणी जशी हवा बदलली आहे तशीच हवा महाराष्ट्रात बदलली आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला आहे, लोक ‘अच्छे दिन’ची आता टिंगल उडवत आहेत. चार-पाच राज्यात पराभव झाल्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आमिषे दाखवायला त्यांनी सुरुवात केल्याचे सांगत, आरक्षण हा ‘चुनावी जुमला’ असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणला पहिल्यापासून पाठिंबा देत होतो इतकेच नाही तर संसदेची मंजुरी मिळवून आणा याचा फायदा पाटीदार, पटेल, जाट यासारख्या देशभर पसरलेल्या समाजालादेखील होईल व त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल. आरक्षण हा मुद्दा केवळ निवडणूक डोळ््यापुढे ठेऊन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विकासाचे काहीच बोलत नाही
आरक्षण ५० टक्यांच्यावर दिले जाऊ नये, असे २०१४ मध्ये सांगणारे आता आरक्षण देत असल्याचेही भुजबळ म्हणाले. गेल्या वेळी मी गुजरातचा विकास केला आहे, त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा, असे सांगणारे मोदी आता विकासाचे काही बोलत नाही, आता तेही लढाई जनता विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगतात. म्हणजे यातून मोदीही गेले आणि विकासही गेला. आता त्यांनी जनतेला यात ओढले असल्याची टीका त्यांनी केली.
पत्रकारांच्या लेखणीवर बंधन
महागाई, पेट्रोल या सारखी चुनावी जुमला सांगून मतदान घेतले, आता देशात मुस्लीम, दलितांवर अन्याय केला जात आहे, विकासाचा कुठेच पत्ता नाही. भ्रष्टाचाराचे अवडंबर केले होते, राफेल साडे पाचशे कोटीचे साडे सोळाशे कोटी का दिले आणि अंबानींनी काय दिले याचे उत्तर अजून दिलेले नाही. वैचारिक स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली, पत्रकारांनी काय लिहावे यावर बंधन आहे. मोठ्या पत्रकारांचे काय झाले, नयनतारा सहगल यांना अडविले, कारण ही मंडळी भाजपवर टीका करणारी होती, अशा विविध मुद्यांवर भुजबळ यांनी टीका.

Web Title: Such a battle against Narendra Modi - Chagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव