एका पाण्यावाचून तहानलेल्या पीकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांची अशीही धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 04:22 PM2019-02-25T16:22:05+5:302019-02-25T16:28:44+5:30

यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरण्याची चिन्हे आहेत. एरव्ही पावसाळ्यात पावसाने उघडीप दिली म्हणजे कपाशीला किंवा दुष्काळात लिंबू, आंबा आदी फळबागायत व ठिबकवरील पिकांना टँकरने पाणी देत ती वाचविण्याचे उदाहरणे आहेत. मात्र चक्क वाफा (सारे) पद्धतीत पेरलेल्या ज्वारीला टँकरने पाणी देण्याची धडपड खेडगाव येथे पहावयास मिळत आहे.

Such a plight of farmers to give a life-threatening pakka to a water-scarcity | एका पाण्यावाचून तहानलेल्या पीकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांची अशीही धडपड

एका पाण्यावाचून तहानलेल्या पीकाला जीवदान देण्यासाठी शेतकऱ्यांची अशीही धडपड

Next
ठळक मुद्देदुष्काळाशी लढताना पिकासाठी वाट्टेल ते...आठ एकरावरील ज्वारीला टँकरने पाणीएका टँकरमधे दोनच वाफेज्वारीचे सिंचन टँकरने करणे म्हणजे काय लागेल? याची कल्पना शेतकरीच करू शकतोजिद्दीने शेतकरी परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करताहेत

संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांची कसोटी पाहणारा ठरण्याची चिन्हे आहेत. एरव्ही पावसाळ्यात पावसाने उघडीप दिली म्हणजे कपाशीला किंवा दुष्काळात लिंबू, आंबा आदी फळबागायत व ठिबकवरील पिकांना टँकरने पाणी देत ती वाचविण्याचे उदाहरणे आहेत. मात्र चक्क वाफा (सारे) पद्धतीत पेरलेल्या ज्वारीला टँकरने पाणी देण्याची धडपड खेडगाव येथे पहावयास मिळत आहे.
येथील योगेश विजय वाणी व संजय रामकृष्ण वाणी या शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर अनुक्रमे दोन व चार-पाच एकर ज्वारीची पेरणी केली होती. यंदा दुष्काळामुळे धान्यापेक्षा चाºयाला सोन्याचे भाव आहेत. नव्हे तर पैसे देवूनही चारा मिळणार नाही अशी भीषण स्थिती आहे. वरील शेतकºयांनी दोन-चार विहिंरीचे पाणी एकत्र करीत मोठ्या कष्टाने आजवर ज्वारीचे पीक वाचविण्याची कसरत पार पाडली. मात्र ऐन ज्वारी कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत आली असता विहिरी कोरड्या पडल्या आणि एका पाण्यावाचून पीक वाया जाण्याची स्थिती ओढवली.
टँकरने पाणी देताना ठिबक असेल तर समजू शकते पण हे शेतकरी पाटपाणी देतात त्या पद्धतीने विहिरीचे पाणी वाफे पद्धतीने देत ज्वारीचे पीक घेत आहेत. आता विहिरीच आटल्याने टँकरने पाणी देताना शेतकºयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकतर ही खर्चिक बाब, कारण एका टँकरला ७००-१००० रुपये मोजावे लागतात. शिवाय शिवारात कुठल्याच विहिरींना पाणी नाही. एका टँकरमधे दोन-तीनच वाफे (सारे) भरले जातात. तेव्हा दोन-चार एकरावरील ज्वारीचे सिंचन टँकरने करणे म्हणजे काय लागेल? याची कल्पना शेतकरीच करू शकतो. दुष्काळाशी लढताना पिकासाठी वाट्टेल ते... या जिद्दीने शेतकरी परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करताहेत हे यानिमित्ताने दिसून येते.
 

Web Title: Such a plight of farmers to give a life-threatening pakka to a water-scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.