दिव्यत्वाची अशीही प्रचिती, तेथे कर आमुचे जुळती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 03:19 PM2019-02-24T15:19:49+5:302019-02-24T15:21:25+5:30

साधारणत: १९६४ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर एक नयनहिन व दुसरा चरणहिन अशा दिव्यागांच्या मैत्रीवर आधारित ‘दोस्ती’ चित्रपट अजरामर ठरला. अशाच निखळ मैत्रीची अनुभूती वडजी, ता.भडगाव येथील एक हिंदू, तर दुसरा मुसलमान पण दिव्यांग असलेल्या मित्रांची दोस्ती देत आहे. जात-पात, धर्म यापलीकडे जात ४० वर्षांपासून एकमेकांना आधार बनत ती घट्ट टिकून आहे.

Such a principle of Divinity, there we can match the tax ... | दिव्यत्वाची अशीही प्रचिती, तेथे कर आमुचे जुळती...

दिव्यत्वाची अशीही प्रचिती, तेथे कर आमुचे जुळती...

Next
ठळक मुद्देसंडे अँकरनिखळ मैत्रीची अनुभूतीजातीपातीच्या भिंती ओलांडणारी दिव्यांगांची ‘दोस्ती’

गणेश अहिरे ।
वडजी, ता.भडगाव, जि.जळगाव : साधारणत: १९६४ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर एक नयनहिन व दुसरा चरणहिन अशा दिव्यागांच्या मैत्रीवर आधारित ‘दोस्ती’ चित्रपट अजरामर ठरला. अशाच निखळ मैत्रीची अनुभूती वडजी, ता.भडगाव येथील एक हिंदू, तर दुसरा मुसलमान पण दिव्यांग असलेल्या मित्रांची दोस्ती देत आहे. जात-पात, धर्म यापलीकडे जात ४० वर्षांपासून एकमेकांना आधार बनत ती घट्ट टिकून आहे.
दिव्यांग परी स्वावलंबी
बन्सीलाल श्रावण हिरे हे सुतार समाजातील लहानपणी पोलिओ झाल्याने दोन्ही पायाने अपंग झालेत. अविवाहीतच राहिले. मोठेभाऊ दिनकर मिस्तरी यांच्याकडेच आपला सुतारी व्यवसाय सांभाळतात. भावाकडेच वास्तव्य व खानपान. आज वयाच्या पासष्टीतही तरुणाला लाजवेल असा कामात उत्साह.
तकदीरशहा शहामतशा फकीर. एक हात, एक पायाने अपंग. विवाहीत असून, पत्नी शेतमजुरी करते. वय वर्षे ५५ असताना ते आपला फकिराचा धर्म निभावतात. चंबल भर दे बाबा.., तेरा बेटा रहे आबाद.. चंबल भर दे बाबा.. अशी दुवा देत दारोदारी हिंडत पीठ, पैसा अशी भिक्षुकी मागतात. पहाडी आवाजाची अल्लाची देण लाभल्यानंदानधर्म करणाऱ्यांची वाहवा मिळवतात.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती...
बन्सीलाल व तकदीरशा यांची मैत्रीवर सांगितल्याप्रमाणे जुनीच. दोन्ही दिव्यांग असल्याने समदु:खी म्हणून एकत्र आले. एकमेकांना तेवढाच भावनिक, आर्थिक आधार देत त्यांची मैत्री फुलली. ती आजवर कायम आहे. तकदीरशाह तसा तकदीरवाला विवाह जुळला. आयुष्यात कष्टाळू पत्नी मिळाली. एकाकीपणाची पोकळी भरुन निघाली. एक हात व एक पाय शाबूत असल्याने निदान चालता येते बन्सीलाल मात्र दोन्ही पायानी अपंग. चालायची सोय देवाने ठेवली नाही. विवाह योग जुळला नाही. अविवाहीतच राहिले. रोजची दैनंदिनी ठरलेली. सकाळी दोन्हे मित्रांची भेट. नंतर तकदीरशा फकिरी मागायला तर बन्सीलालला भावाला सुतारी कामात थोडाफार हातभार लावण्याचे काम. काम नसले की पुन्हा तकदीर, बन्सीनाना एकत्र. बन्सीला तशी अपंगासाठीची सायकल मिळालेली. कुठे जायचे म्हटले तर तकदीरचा हात आहेच. न कंटाळता न थकता तो आपल्या मित्रास भडगाव, दूरवर सायकल लोटत सैर घडवून आणतो. कुठेही जायचे असले म्हणजे सायकल लोटणारे हात तकदीरचे असे दृश्य पहावयास मिळाले म्हणजे सांगायला फकीर पण साक्षात बन्सीच्या ‘तकदीर की लकीर, त्यांची मैत्री बनलेली.’ आजवर हा मैत्रीचा सिलसिला टिकून आहे. जात-पात, धर्म एक नाही. त्यांच्यासाठी एकमेकांसाठी माणुसकी, मैत्री जपणे हाच धर्म. एकमेकांच्या आधाराने नशिबी आलेले दिव्यागांचे जिणे सुसह्य करणे आज धर्म. यामुळे दोघांची मैत्री हा साहजिकच त्यांना भेटणाºयांना त्यांच्यातील दिव्यत्वाची प्रचिती देतो.
दिव्यागांची अशीही दिव्यदृष्टी
बन्सीलाल हिरे. जेमतेम चार-पाच इयत्ता शिक्षण पण. दिव्यांग असूनही दिव्यदृष्टी लाभल्यागत ते पोथी-पारायण वाचतात. श्रावण महिन्यात कुठेन कुठे त्यांचा धार्मिक कार्यक्रम असतो. मरणाच्या वाटेवरील एखादा वयस्कर म्हातारा-म्हातारी कुंठीत जीव अडकलेला म्हणून व्याकूळ झालेला असताना. बन्सी नानाला खास बोलावत पोथी लावली जाते. खाटेवरून उतरवलेली ती हस्ती मुक्ती मिळाल्यागत मोक्षास प्राप्त होते. यासारखे दुसरे पुण्याचे काम ते कोणते? नावात हिरे तसेच त्यायोगे आपल्या पारंपरिक सुतारी व्यवसायात ते हीरोच. सुतार काम, लोहार काम ते सहजपणे करतात. दोन्हीही पाय अधू असताना तीर्थाटनाची त्यांना फारच धार्मिक गोडी. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र एवढेच नव्हे तर काशी, प्रयाग, मथुरा, हरिद्वार व अमृतसरला ते जावून आले.

Web Title: Such a principle of Divinity, there we can match the tax ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.