‘सुफीयाना’ अंदाज जळगावकरांना भावला, निजामी बंधूंना दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 01:11 PM2019-08-20T13:11:21+5:302019-08-20T13:11:42+5:30

निजामी बंधूंना दाद : लोकमत व आनंदयात्री क्लब आयोजित पीपीआरएल मेरा घर यांची प्रस्तुती

'Sufi'ana' guesses Jalgaonkar, Nizami brothers support | ‘सुफीयाना’ अंदाज जळगावकरांना भावला, निजामी बंधूंना दाद

‘सुफीयाना’ अंदाज जळगावकरांना भावला, निजामी बंधूंना दाद

Next

जळगाव : ‘ख्वाजा मेरे ख्वाजा..दिल मे समाजा’, ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मै ना जाऊंगा खाली’..‘कुन फाया कुन ’ अशा एकाहून एक सरस सुफी गीतांच्या धुनवर निजामी बंधूनी आपल्या सुफीयाना अंदाजव्दारे जळगावकरांना अक्षरश आपल्या प्रेमात पाडले. ‘लोकमत’ व आनंदयात्री क्लब आयोजित पी.पी.आर.एल.मेरा घर प्रस्तुत ह्यनिजामी बंधू सुफी नाईटह्ण हा कार्यक्रम सोमवारी रात्री शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात पार पडला. सुफी गीत व सदाबहार कव्वाली, शेरोशायरीने या कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर सीमा भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पीपीआरएल चे संचालक विनय पारख व हितेश पारख, आनंदयात्री क्लबचे कौशल नवाल, नवरंग चहाचे संचालक अमर कुकरेजा, रेडीओ सीटीचे जाहीरात व्यवस्थापक प्रसाद गिरासे, फोकस हुंडाईचे प्रदीप गिरासे, आनंद कोठारी, रोहित सूर्यवंशी, मल्टीमिडीयाचे संचालक सुशील नवाल, नवजीवन सुपर शॉपीचे अनिल कांकरिया, हिरा टेक्सस्टाईलचे संचालक मोहन कावना, ‘लोकमत‘चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, े सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी उपस्थित होते. निजामी बंधू अर्थात चांद निजामी, पुुतणे शादाब फरिदी निजामी, सोहराब निजामी तसेच मुले कामरान आणि गुलखान यांनी एकापेक्षा एक सरस अशी गाणी सादर करीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. संगीतामधून भारतीय एकात्मतेचा संदेश निजामी बंधूनी आपल्या सुफी गीतांव्दारे भारतीय ऐक्याचा संदेश देत ‘सुफी नाईट’ची रंगत वाढवली. ‘बनाके तुझको मौला, खुद को बंदा कर लिया मैने, हो मेहंगा या हो सस्ता अब तो सौदा कर लीया मैने’ अशा शायरीने उपस्थितांची वाह व्वा मिळवली. ‘खुद बेचेंगे तुझको ना बिकने देंगे, हम जमाने मे तेरी शान ना रुकने देंगे, जान दे देंगे लेकीन तिरंगा ना झुकने देंगे’ अशा देशभक्तीपर शायरीने सभागृहातील नागरिकांच्या अंगावर रोमांच उभे केले. देशभक्ती, हिंदू-मुस्लिम ऐक्यासह आजच्या तरुणाईचा मनाचा ठाव घेत प्रेमावर आधारीत शेरो शायरीने कार्यक्रमात एक वेगळीच बहार आणलेली पहायला मिळाली. टाळ्या व शिट्ट्यांची दाद निजामी बंधूंच्या गाण्याला प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट व शिट्यांनी दाद मिळत होती़ जळगावकर गाणे केवळ ऐकत नाहीत तर समजून घेतात या शब्दात जळगावकरांच्या या प्रतिसादाला निजामी बंधूंनी सलाम केला़ मेरे रश्के कमर गितावर तरूणार्इंनी जल्लोष केला. यासह देशभक्तीवर सादर झालेल्या शेरोशायरीला प्रेक्षकांमधून जोरदार दाद मिळाली़ दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए या गाण्यांने तर सर्वांच्या अंगावर शहारे आणले होते़ प्रेक्षकांनी उभे राहून या गाण्याला दाद दिली़ यांनी दिली साथसंगत निजामी बंधूना बॅन्जोवर इस्तीयाक अहमद, तबला- नजीम अहमद, ढोलकीवर मोहम्मद शोएब, झिशान अहमद कोर, कैसर अहमद यांनी उत्कृष्ट साथ संगत देत या सुफी नाईटला बहारदार बनविले़ कुन फाया कुन व भर दो झोली मेरी या मुहम्मद...वर रसिक मंत्रमुग्ध निजामी बंधूनी एकाहून एक सरस सुफी गीते सादर करत संपुर्ण सभागृह रममाण झालेले पहायला मिळाले. ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘कुन फाया कुन’ , बजरंगी भाईजान चित्रपटातील‘ भर दो झोली मेरी या मुहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली’, जोधा अकबरमधील ‘ख्वॉजा मेरे ख्वाजा मेरे’ व नुसरत फतेह अली खान यांची ‘मेरे रश्के कमर’ या तीन गीतांवर उपस्थित सर्व रसिक मंत्रमुग्ध झालेले पहायला मिळाले. तसेच ‘हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए’ या गीताला आपल्या खास सुफी अंदाजात सादर करत निजामी बंधूनी उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळवली. मोबाईलमध्ये कैद केली सुफी नाईट निजाम बंधूंच्या मधूर गाणी ऐकण्यासाठी सभागृह फुल्ल भरलेले होते़ सर्वच रसिक हा सुफी नाईटचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करीत होते़ नाट्यगृहाच्या दरवाजावरही अनेक तरूण उभे राहून संगीताचा आनंद घेत होते. कोई पुकारे अल्ला, कोई कहे राम जिसके मन को जैसा भाए वैसा ले नाम हात खुले तो अल्ला अल्ला हात जुडे तो राम राम असा शेर चांद निजामी यांनी सादर करताच टाळ्यांचा एकच गजर झाला. कार्यक्रम हाऊसफुल्ल लोकमत आयोजित सुफी नाईट कार्यक्रमाला जळगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले होते. नाट्यगृहात जल्लोष निजामी बंधूंनी तेरे रश्के कमर... या सुफी गीतांची सुरूवात करताच रसिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सुफी गीतांच्या तालावर थिरकत जळगावकरांनी टाळ्याचा कडकडाट केला.

Web Title: 'Sufi'ana' guesses Jalgaonkar, Nizami brothers support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव