अंतुर्ली शिवारात शाॅर्ट सर्कीटने ऊसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 PM2021-03-09T16:18:22+5:302021-03-09T16:18:58+5:30
अंतुर्ली शिवारातील रविंद्र शामराव पाटील यांचे शेतातील ऊस पिकाला विज शाॅर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील रविंद्र शामराव पाटील यांचे शेतातील ऊस पिकाला विज शाॅर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत दिड एकर संपूर्ण ऊसाचे पिक जळून खाक झाल्याची घटना घङली. या आगीत सुमारे दिड लाखांचे नुकसान झाले आहे.याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला रविंद्र शामराव पाटील शेतमालक (अंतुर्ली ता. भडगाव) यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. ही घटना दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. अंतुर्ली शिवारात दोन एकर ऊस पिकाची लागवड केलेली आहे. ही जमीन रविंद्र पाटील यांचा मुलगा प्रतिक व मुलगी निकीताच्या नावे आहे. या क्षेत्रात लागवड केलेल्या ऊस पिकास अचानक आग ऊस जळून खाक झाला आहे. या क्षेत्रातून वीज वाहिन्या दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्या आहेत. या तारांच्या घर्षणामुळे ऊसास आग लागून नुकसान झालेले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पाचोरा अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते. आग विझविल्याने काही ऊसाचे क्षेत्र वाचविण्यात नागरीकांना यश आले. मात्र उर्वरीत दिड एकर ऊसाचे जळून नुकसान झाले. वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तसा पंचनामा केला आहे. दि. ९ रोजी जळगाव विज वितरणचे विद्युत निरीक्षक एस. डी. चौधरी यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.