रावळगाव कारखान्याकडून उसाचे पेमेंट मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:17 AM2021-09-11T04:17:37+5:302021-09-11T04:17:37+5:30
ऊस उत्पादकांना पेमेंट मिळवून देण्यासाठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांशी, शासन दरबारी संघर्ष ...
ऊस उत्पादकांना पेमेंट मिळवून देण्यासाठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांशी, शासन दरबारी संघर्ष करून न्याय देण्याचा प्रयत्न केला उसाचे पेमेंट १८ टक्के व्याजासहित देण्याचे पदाधिकाऱ्यांनी मान्य करूनही अद्याप अनेक शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नाही काहींना प्रति टन एक ते दोन हजार रुपये मिळाले आहेत. पदाधिकाऱ्यांनी २५३३ रुपये प्रति टन देण्याचे मान्य करूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत, ज्यांना एक हजार रुपये मिळाले आहेत त्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम विनाविलंब मिळावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले नाही त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देण्यासाठी आमदार चव्हाण यांनी लक्ष घालावे, अशी मागणी उत्पादकांनी केली आहे.