युवासेनेच्या बैठकीत संघटन मजबुतीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:31+5:302021-02-15T04:15:31+5:30
बैठकीला आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महानंदा पाटील, किशोर भोसले, ...
बैठकीला आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महानंदा पाटील, किशोर भोसले, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, चंद्रकांत शर्मा, स्वप्नील परदेशी, राहुल पोतदार, विशाल वाणी, शोभा चौधरी, विश्वजित पाटील श्रीकांत पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
ममुराबाद येथे पोस्टर प्रदर्शन
जळगाव - बर्ड काऊंट इंडिया आयोजित ‘ग्रेट ब्याकयार्ड बर्ड काऊंटनिमित्त’ निसर्गमित्र तर्फे रविवारी ममुराबाद येथे पोस्टर प्रदर्शन व पक्षिगणना उपक्रम घेण्यात आला. १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान भारतभर ही पक्षिगणना, पोस्टर प्रदर्शन उपक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून ममुराबाद येथील बस स्टँडजवळ ‘पक्षी जगताला असलेले धोके’ या विषयावरील पोस्टर्स प्रदर्शन लावण्यात आले. तसेच ममुराबाद रोड परिसरात पक्षिगणना करण्यात आली. या पक्षी गणनेत वीटभट्टी कामगारांची मुले सहभागी झाली होती. यावेळी अनेक पक्षी आढळून आले, अशी माहिती राजेंद्र गाडगीळ व शिल्पा गाडगीळ यांनी यांनी दिली.
शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण
जळगाव- शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण रविवारी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. सतरा मजली प्रशासकीय इमारती जवळ शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, माजी महानगर प्रमुख अंकुश कोळी, फेरीवाला सेना महानगर प्रमुख बाळू बाविस्कर, जब्बार शेख, वसीम खान, इमरान शहा, साबीर खाटीक, कैलास कोळी, आसिफ शाहा, अशरफ भिस्ती, सतीश शिंपी, योगेश चौधरी, निर्मला शिंपी, मुस्तकीम बागवान, विनोद शिंपी आदी उपस्थित होते.
मरणासन्न झाडाला दिले जीवदान
जळगाव : मेहरूण तलावाच्या काठी मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या एका निंबाच्या झाडाला रविवारी सकाळी डॉ. महेंद्र काबरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले आहे. शिवाय तलावाच्या काठावर असलेल्या इतर झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी निसर्गावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. मेहरूण तलावाच्या काठावर फिरत असताना निंबाचे झाड मरणासन्न अवस्थेत तुटलेल्या अवस्थेत डॉ. महेंद्र काबरा, प्रा. एस.व्ही. सोमवंशी, मयूर पाटील यांना दिसले. हे झाड तलावाकाठी फिरणाऱ्या बकऱ्या, गायी, म्हशींच्या भक्ष्यस्थानी पडले होते. लगेचच झाडाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या झाडाला पाणी देऊन त्याला संरक्षण कुंपण करण्यात आले आहे.
लिंगायत स्मशानभूमीत एलईडी
जळगाव -शहरातील शिवाजीनगर भागातील लिंगायत स्मशानभूमी व मुस्लीम कब्रस्थानमध्ये लाईट नसल्याने रात्रीच्या वेळेस अंधार असते, याबाबतच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, या दोन्ही ही स्मशानभूमीत एलईडी बसविण्यात आल्याची माहिती नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिली आहे. याठिकाणी मनपा आरोग्य विभागाकडून साफसफाई देखील करण्यात आली.