तिघ्रे शिवारात परप्रांतीय मजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:11+5:302021-04-20T04:16:11+5:30
फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराने शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्या घटना ...
फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराने शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्या घटना सोमवारी सकाळी तिघ्रे शिवारात उघडकीस आली. संतोष रॉय भिम रॉय (वय २३,रा. दोंदिया पो. अम्बा जरूवाडीह, जि. जरमुण्डी दुमका झारखंड, ह.मु. तिघ्रे ता.जळगाव) असे या मजुराचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, संतोष रॉय भिम रॉय हा तरुण गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामावर होता. रविवारी सहकारी मजुरांसोबत काम करणाऱ्या मजुरांसह त्याने रात्री जेवण केले. दरम्यान, सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिघ्रे शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. तातडीने त्याला गोदावरी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र इंधाटे करीत आहे.